Tuesday, March 18, 2025
Homeक्रीडाChampions Trophy 2025: ८ संघ, १५ सामने, जाणून घ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल सर्व...

Champions Trophy 2025: ८ संघ, १५ सामने, जाणून घ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल सर्व काही

मुंबई: पुढील वर्षी पाकिस्तानच्या यजमानपदाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ख्रिसमच्या ठीक एक दिवस आधी मंगळवारी हे वेळापत्रक जाहीर केले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आधीच स्पष्ट केले होते की भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. अशातच ही स्पर्धा हायब्रिड मॉडेल अंतर्गत होईल. आयसीसीने या स्पर्धेसाठी चार ठिकाणे ठरवली आहेत. एक ठिकाणी यूएईमधील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहे. यात भारतीय संघ सर्व सामने खेळणार आहे.

भारतीय संघाचा दुसरा सामना पाकिस्तानशी

चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरूवात १९ फेब्रुवारीपासून होत आहे. तर खिताबी सामना ९ मार्चला खेळवला जाईल. सुरूवातीचा सामना १९ फेब्रुवारीला पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराचीमध्ये होईल. भारतीय संघ आपला पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळणार हे. तर भारतीय संघ आपला दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळेल. हा सामना २३ फेब्रुवारीला यूएईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगेल. या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे.

भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये ८ संघादरम्यान १५ सामने रंगतील. सर्व संघांना २ ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुप एमध्ये आहेत. त्यांच्यासोबत बाकी दोन संघ न्यूझीलंड आणि बांग्लादेश आहेत. तर ग्रुप बीमध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंडला ठेवण्यात आले आहे.

प्रत्येक ग्रुपमध्ये किती सामने खेळवले जाणार

सर्व ८ संघ आपापल्या ग्रुपमध्ये ३-३ सामने खेळतील. यानंतर प्रत्येक ग्रुपमधील टॉप २ संघ सेमीफायनलासाठी क्वालिफाय ठरतील. पहिला सेमीफायनलचा सामना दुबई, दुसरा लाहोरमध्ये होईल. यानंतर फायनल सामना खेळवला जाईल.

स्पर्धेतील ग्रुप

ग्रुप ए – पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश
ग्रुप बी – दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड

चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक

१९ फेब्रुवारी – पाकिस्तान वि न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची
२० फेब्रुवारी – बांग्लादेश वि भारत, दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई
२१ फेब्रुवारी – अफगानिस्तान वि दक्षिण अफ्रीका, नेशनल स्टेडियम, कराची
२२ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
२३ फेब्रुवारी – पाकिस्तान वि भारत, दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई
२४ फेब्रुवारी – बांग्लादेश वि न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
२५ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया वि दक्षिण अफ्रीका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
२६ फेब्रुवारी- अफगानिस्तान वि इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
२७ फेब्रुवारी – पाकिस्तान वि बांग्लादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
२८ फेब्रुवारी – अफगानिस्तान वि ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
१ मार्च – दक्षिण अफ्रीका वि इंग्लंड, नेशनल स्टेडियम, कराची
२ मार्च – न्यूझीलंड वि भारत, दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई

सेमीफायनल आणि फायनलचे सामने

४ मार्च – सेमीफायनल १, दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई
५ मार्च – सेमीफ़ायनल २, गद्दाफ़ी स्टेडियम, लाहोर
९ मार्च – फायनल – गद्दाफ़ी स्टेडियम, लाहोर (टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यास सामना यूएईमध्ये होईल.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -