Monday, May 12, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजअर्थविश्व

Bank Holiday : बँकांचे कामकाज तीन दिवस राहणार बंद

Bank Holiday : बँकांचे कामकाज तीन दिवस राहणार बंद

मुंबई : महाराष्ट्रात तीन दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. ग्राहकांनी या सुट्या लक्षात ठेवून बँकेशी संबंधित कामांचे नियोजन करावे, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे.


आज मंगळवार २४ डिसेंबर आहे आणि वर्ष पुढल्या आठवड्यात मंगळवार ३१ डिसेंबर रोजी संपणार आहे. या कालावधीत महाराष्ट्रात तीन दिवस बँकांचे कामकाज बंद असेल. राज्यात बुधवार २५ डिसेंबर रोजी नाताळ अर्थात ख्रिसमस निमित्त बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. यानंतर २८ डिसेंबर रोजी चौथा शनिवार म्हणून नियमानुसार बँकांचे कामकाज बंद असेल. नंतर २९ डिसेंबर रोजी रविवार म्हणून नियमानुसार बँकांचे कामकाज बंद असेल. यामुळे वर्ष संपण्याच्या सुमारास राज्यात बँकांचे कामकाज बुधवार २५ डिसेंबर, शनिवार २८ डिसेंबर आणि रविवार २९ डिसेंबर असे तीन दिवस बंद राहणार आहे. बँकांचे कामकाज बंद राहणार असले तरी एटीएम सेवा, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग सुरू राहणार आहे. यामुळे बँकेत न जाता दैनंदिन आर्थिक व्यवहार करणाऱ्या कोट्यवधी बँक ग्राहकांचे काम विना अडथळा सुरू राहणार आहे.


बँकांचे कामकाज 'या' दिवशी बंद राहणार




  1. बुधवार २५ डिसेंबर २०२४ - नाताळ अर्थात ख्रिसमस निमित्त सुटी

  2. शनिवार २८ डिसेंबर २०२४ - चौथा शनिवार, सुटी

  3. रविवार २९ डिसेंबर २०२४ - रविवारची सुटी

Comments
Add Comment