Saturday, May 10, 2025

विदेशमहत्वाची बातमी

शस्त्रास्त्र कारखान्यात स्फोट, १२ ठार

शस्त्रास्त्र कारखान्यात स्फोट, १२ ठार
तुर्की : तुर्कीतील शस्त्रास्त्र कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात १२ जण ठार झाले आहेत. वायव्य तुर्कस्तानमध्ये असलेल्या कारखान्यात मंगळवारी सकाळी ही दुर्घटना झाली आहे. चार जण गंभीर जखमी झाले असून, स्फोटाची तीव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तुर्कीतील बालिकेसिर प्रांतात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी युद्धसामग्री आणि स्फोटके बनवणारी झेडएसआर ॲम्युनिशन प्रोडक्शन फॅक्टरी आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्फोटानंतर कारखान्याची इमारत कोसळली, तपास यंत्रणांकडून अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तुर्की हा प्रमुख शस्त्र निर्यातदार दैशांपैकी एक आहे. विशेषत: हा देश ड्रोन निर्मितीसाठी ओळखला जातो.
Comments
Add Comment