सातारा : कराडमधील ढेबेवाडीत स्वयंपाकाच्या गॅसचा स्फोट होऊन घराचं नुकसान झाल्याची भीषण घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र संसारोपयोगी सामान जळून खाक झाले. रविवारी (दि २२) रोजी दुपारच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
कराडमधील ढेबेवाडी येथील विंग पाणंद रस्त्याला लागून तानाजी कणसे यांचे घर आहे. रविवारी (दि २२) सुट्टी असल्याने कणसे कुटुंब घरीच होते. दुपारच्या सुमारास स्वयंपाक घरातून येणार धूर संशयास्पद वाटल्याने कणसे यांनी बायको व दोन मुलांसह घराच्या बाहेर पळ काढला. त्यानंतर काही क्षणातच सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडर साधारण २५ फूट हवेत उंच उडून मोठा आवाज झाला.
Pune: पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना डंपरने चिरडले, ३ जणांचा जागीच मृत्यू
सिलेंडरच्या स्फोटातून कणसे कुटुंब वाचलं मात्र त्यांच्या घरातील किंमती व संसारोपयोगी सामान मात्र जळून खाक झाले. आगीला आटोक्यात आणण्यासाठी आजूबाजूच्या रहिवाश्यांनी घरातील पाणी मारले तरीही आग आटोक्यात आली नाही तब्बल एक तासाने कराड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या सहाय्याने आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत कणसे यांच्या घरातील कपडे, दागिने, कपाट, धान्य यांसारख्या मौल्यवान वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या स्फोटात कणसे यांच ७ लाखांच नुकसान झाले असल्याची माहिती घटनास्थळावरील ग्रामस्थांनी दिली.