Sunday, May 11, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Shyam Benegal : सिने इंडस्ट्रीतील दिग्गज दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे दीर्घ आजाराने निधन

Shyam Benegal : सिने इंडस्ट्रीतील दिग्गज दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे दीर्घ आजाराने निधन

मुंबई: सिने इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल(Shyam Benegal) यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. श्याम बेनेगल हे दीर्घकाळापासून आजारी होते. संध्याकाळी ६.३९वाजता त्यांचे निधन झाले.


श्याम बेनेगल यांची कन्या पिया बेनेगल यांनी प्रसारमाध्यमांना याबाबतची पुष्टी केली. मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयात त्यांचे निधन झाले. श्याम बेनेगल हे क्रोनिक किडनीच्या आजाराने त्रस्त होते. नुकताच श्याम बेनेगल यांनी आपला ९०वा वाढदिवस साजरा केला होता. अभिनेत्री शबाना आझमी यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले होते. फोटोत श्याम बेनेगल, शबाना आणि नसरूद्दीन शहा यांच्यासह हसताना दिसले होते.


 



 










View this post on Instagram























 

A post shared by Shabana Azmi (@azmishabana18)





श्याम बेनेगल यांचा जीवन परिचय


श्याम बेनेगल यांनी १९७४मध्ये अंकुर या सिनेमाने दिग्दर्शनाची सुरूवात केली होती. हा सिनेमा सामाजिक मुद्द्यांवर आधारित होता. या सिनेमाने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली होती. याशिवाय त्यांनी अनेक महत्त्वाचे सिनेमे बनवले. त्यांनी निशांत, मंथन, भूमिका आणि सरदारी बेगम सारखे सिनेमे बनवले. या सिनेमांची आजही आठवण काढली जाते.


श्याम बेनेगल यांनी भारतीय सिने इंडस्ट्रील अनेक हिरे दिले. यात शबाना आझमी, स्मिता पाटील, नसरुद्दीन शहा, ओम पुरी, अमरीश पुरी, अनंत नाग सारख्या महान अभिनेत्यांचा समावेश आहे. सिनेमांशिवाय दूरदर्शनवर येणाऱी प्रसिद्ध मालिका भारत एक खोज आणि कहता है जोकर, कथा सागर यांचे दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केले होते.
Comments
Add Comment