Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीR. Ashwin : आर अश्विनच्या निवृत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भावनिक पत्र

R. Ashwin : आर अश्विनच्या निवृत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भावनिक पत्र

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरूद्धची तिसरी कसोटी संपल्यानंतर भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निर्णयाने प्रत्येक क्रिकेट चाहता भावूक झाला.आता देशांतर्गत आणि लीग स्पर्धेत अश्विन खेळताना दिसणार आहे. असं असताना त्याला भावी वाटचालीसाठी अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या.त्यांनतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अश्विनला पत्र लिहून त्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्याच्या क्रिकेट क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्याचे तोंडभरून कौतुक देखील केले आहे.

https://prahaar.in/2024/12/23/high-court-slams-thane-municipality-over-unauthorized-hoardings/#google_vignette

’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविचंद्रन अश्विनला त्याच्या १४ वर्षांच्या चमकदार आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविचंद्रन अश्विनला शुभेच्छा देत भावनिक पत्र लिहिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात लिहिलं की, ज्याप्रमाणे फलंदाजांना अश्विनकडून ऑफ स्पिनची अपेक्षा असताना तो कॅरम बॉल टाकून त्यांना चकवायचा, तसेच त्याची निवृत्ती देखील एका कॅरम बॉलसारखी होती, ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती, परंतु सर्वांनाच धक्का बसला. याशिवाय मोदींनी T20 World Cup 2022 मधील भारत-पाकिस्तान सामन्याचाही उल्लेख केला. अश्विनने पाकिस्तान विरूद्ध सोडलेला वाइड बॉल आणि त्यानंतर विजयासाठी शेवटच्या चेंडूवर काढलेली १ धाव यातून अश्विनची बुद्धिमत्ता दिसून येते, असं सांगत आर अश्विनचं कौतुक केलं आहे.

या वर्षी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिके दरम्यान अश्विनला अचानक सामन्याच्या मध्यात चेन्नईला परतावे लागले, कारण त्याची आई आजारी पडली. आपल्या पत्रात, पंतप्रधानांनी यासाठी अश्विनच्या वचनबद्धतेचे देखील कौतुक केले. कारण तो त्याच्या आईला भेटून आला आणि दुसऱ्याच दिवशी परत मैदानात मॅच खेळायला उतरला. जर्सी क्रमांक ९९ ची अनुपस्थिती लोकांना नेहमीच जाणवेल. जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले तो क्षण क्रिकेटप्रेमींच्या कायम लक्षात राहतील.’ असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात लिहिलं आहे.२०११चा वनडे विश्वचषक आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धांच्या विजेत्या संघातही अश्विनचा समावेश होता. ‘२०२१ मध्ये सिडनी येथे खेळलेल्या धाडसी मॅच सेव्हिंग इनिंगसह, बॅटनेही आपण आपल्या देशाला अनेक अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत.’, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -