Wednesday, May 21, 2025

विदेशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

PM Modi Kuwait Visit : कुवैतमध्ये पंतप्रधान मोदींना मिळाला सर्वोच्च पुरस्कार!

PM Modi Kuwait Visit : कुवैतमध्ये पंतप्रधान मोदींना मिळाला सर्वोच्च पुरस्कार!

कुवैत : PM नरेंद्र मोदी यांचा नुकताच कुवैत दौरा पार पडला. पंतप्रधान मोदी दोन दिवसीय दौरा आटोपून कालच भारतात परतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुवैत दौरा खास होता. कारण ४३ वर्षानंतर कुवैत दौऱ्यावर जाणारे पंतप्रधान मोदी पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. मोदींच्या आधी फक्त इंदिरा गांधी यांनी १९८१ साली कुवैतचा दौरा केला होता. भारतासाठी आखाती देशांमधील कुवैत हा अत्यंत महत्त्वाचा देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कुवैत दौऱ्यात ‘विसम मुबारक अल-कबीर’ किंवा ‘ऑर्डर ऑफ मुबारक दे ग्रेट’ या कुवैतच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलं. कुवैतचे एमीर शेख मीशाल अल-अहमद अल-जाबीर अल-साबह यांनी पंतप्रधान मोदींना या पुरस्कराने सन्मानित केलं. हा पुरस्कार काय आहे? आणि पंतप्रधान मोदींना तो मिळाला, यामागच महत्त्व काय? हे समजून घ्या.


कुवैत सरकार ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर’ पुरस्काराने विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांना तसेच राज परिवारातील सदस्यांना सन्मानित करते. मैत्रीसंबंध मजबूत करणं आणि सदिच्छा, सदभावना हा पुरस्कार देण्यामागे हेतू असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधी इंग्लंडच्या राणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय, माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एचडब्ल्यू बुश, बिल क्लिंटन, सौदी अरेबियाचे राजे किंग सलमान आणि फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सरकोझी यांना ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.



पंतप्रधान मोदी X वरील पोस्टमध्ये काय म्हणाले?


“आमच्या दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ संबंध आहेत, त्यानुसार आम्ही आमची भागिदारी रणनितीक स्तरापर्यंत वाढवली आहे. ही मैत्री येणाऱ्या दिवसात अधिक भक्कम होईल अशी मला अपेक्षा आहे” असं पंतप्रधान मोदींनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी कुवैतचे पंतप्रधान अहमद अब्दुल्ला अल-अहमद अल-सबाह आणि क्राऊन प्रिन्स सबा अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांच्यासोबत व्यापक चर्चा केली. द्विपक्षीय संबंध बळकट करण्याबरोबरच त्यांना वेग देणं हा त्यामागे उद्देश होता.




Comments
Add Comment