हॉलीवूड सिनेमा 'मुफासा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, कोट्यावधींची कमाई

मुंबई : बॅरी जेनकिन्स दिग्दर्शित लायन किंग फिल्म युनिव्हर्सचा सिक्वेल असलेला 'मुफासा: द लायन किंग' हा चित्रपट 'वनवास' सोबत २० डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या दिवसापासूनच 'मुफासा'ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. थिएटरमध्ये 'मुफासा'चे शो हाऊसफूल होत आहेत.अवघ्या दोनच दिवसात 'मुफासा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. या सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, पहिल्याच दिवशी या सिनेमाने ८.८ कोटींचा गल्ला जमवला. सुरुवात जरी धिम्या गतीने झाली असली तरीदेखील दुसऱ्या दिवशी 'मुफासा'ने १३.७ कोटींची कमाई केली आहे.


'मुफासा: द लायन किंग' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवसापासूनच 'मुफासा'ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. थिएटरमध्ये 'मुफासा'चे शो हाऊसफूल होत आहेत. 'मुफासा: द लायन किंग' या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये ८.८ कोटी रुपयांची कमाई केली.दुसऱ्या दिवशी रात्री १०.१५ वाजेपर्यंत चित्रपटाने १३.५४ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन २२.३४ कोटी रुपये झाले आहे.


 


दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी नाना पाटेकर आणि उत्कर्ष शर्मा यांच्यासोबत वनवास बनवला आहे, जो मुफासासोबत रिलीज झाला आहे. वनवासची ओपनिंग फक्त ६० लाख रुपये होती, तर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाची कमाई जेमतेम १ कोटींवर पोहोचली. तर हॉलिवूड चित्रपट 'मुफासा'ने यापेक्षा कितीतरी अधिक कमाई केली आहे.पुष्पा २ ने १००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि अजूनही सिनेमागृहांत हा चित्रपट आहे. एवढ्या मोठ्या ब्लॉकबस्टरसमोरही मुफासाच्या कमाईत कोणतीही घट झालेली नाही. दोघांच्या रोजच्या कमाईत फक्त थोडा फरक आहे.


'मुफासा: द लायन किंग' हा एक अ‍ॅनिमेशन चित्रपट आहे. 'द लायन किंग' हा चित्रपट १९९४ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यानंतर २०१९ मध्ये या चित्रपटाचा रीमेक बनवण्यात आला. आता तब्बल ५ वर्षांनंतर त्याचा प्रीक्वल आला आहे. शाहरुखने मुफासा या मुख्य भूमिकेचं हिंदीत डबिंग केलं आहे. तर आर्यनने मुफासाचा मुलगा सिंबा आणि अबरामने तरुण मुफासाचं रेकॉर्डिंग केलं आहे. या सिनेमासाठी शाहरुख आणि त्याच्या लेकांबरोबरच श्रेयस तळपदे, मकरंद देशपांडे, संजय मिश्रा, मियांग चांग या कलाकारांनीही आवाज दिले आहेत. तर तेलुगु भाषेतील डबिंगसाठी सुपरस्टार महेश बाबूने या चित्रपटाला आवाज दिला आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरे ‘बिग बॉस१९’च्या घराचा नवा कॅप्टन !

मुंबई : ‘बिग बॉस १९’ रिऍलिटी शो चांगलाच गाजत आहे. रोज नवे वाद,प्रेम आणि राजकारण या शो मध्ये पाहायला मिळतंय. याच शो

गौतमी पाटील आणि अभिजीत सावंत यांचं नेमकं चाललंय तरी काय?

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात सध्या एक नव्या जोडीची चर्चा रंगली आहे ‘इंडियन आयडॉल’ फेम अभिजीत सावंत आणि लोकप्रिय

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा : ‘अभंग तुकाराम’

मुंबई : महाराष्ट्राला संत-महात्म्यांची उज्ज्वल परंपरा आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या

साईबाबांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवींची प्रकृती गंभीर, उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. सेप्टिक

‘द फॅमिली मॅन ३’ लवकरच प्रेक्षकांसमोर; प्राइम व्हिडिओने केली अधिकृत घोषणा

मुंबई : प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतीक्षेनंतर अखेर प्राइम व्हिडिओने बहुचर्चित आणि सुपरहिट वेब सिरीज ‘द फॅमिली

संजय मिश्रांनी ६२ व्या वर्षी महिमा चौधरीशी केला विवाह ?

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी ही पुन्हा एकदा सिनेविश्वात सक्रिय झाली आहे. सध्या सोशल मीडियावर महिमा