Wednesday, March 19, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेThane Hordings : ठाणे शहरातील अनधिकृत होर्डिंगवरून उच्च न्यायालयाचे पालिकेवर ताशेरे

Thane Hordings : ठाणे शहरातील अनधिकृत होर्डिंगवरून उच्च न्यायालयाचे पालिकेवर ताशेरे

ठाणे : ठाणे शहरातील भल्यामोठ्या ४९ अनधिकृत होर्डिंगवर कागदोपत्री कारवाईचा दिखावा करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाला उच्च न्यायालयाने फटकारले. तसेच पालिकेला शपथपत्र सादर करण्यास सांगून ठोस कारवाईचे आदेश दिलेत. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने बेकायदा होर्डिंगवर कारवाई केली होती. मात्र ठाणे महापालिकेने किती फलकांवर काय कारवाई केली याबाबत संदिग्धता होती. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओवळा-माजिवडा विधानसभा विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी माहिती घेतली व त्यात धक्कादायक माहिती उघडकीस आली. ठाणे महापालिका आयुक्तांना निवेदन देऊनही गेली अनेक वर्षे महापालिकेची फसवणूक करणाऱ्या होर्डिंग व्यवसायिकांसह, चुकीचा स्थळ पाहणी अहवाल देणाऱ्या जाहिरात विभागातील अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती. महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराला कंटाळून वकील सागर जोशी यांच्यामार्फत संदीप पाचंगे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर झालेल्या सुनावणीत महापालिकेची बाजू मांडणारे वकील मंदार लिमये यांना कोर्टाने खडेबोल सुनावले.

https://prahaar.in/2024/12/23/if-you-are-also-printing-large-billboards-then-this-news-is-for-you/#google_vignette

महापालिकेने ११ कोटी रूपयांचा दंड ४९ जाहिरात फलक कंपन्यांना ठोठावला होता तसेच वसूल करायला ७ दिवसांची वेळ दिली होती मात्र महापालिका राजकीय दबावामुळे कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. अनधिकृत ४९ होर्डिंगवर काय कारवाई केली, याची माहिती सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, फलकांचा वाढीव आकार कमी करण्याचे आदेश देण्याशिवाय महापालिकेने काहीच कारवाई केलेली नाही. काही जाहिरात कंपन्यांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन करून भलेमोठे फलक लावण्यात आले आहेत. महापालिका अकार्यक्षम आहे किंवा होर्डींग व्यवसायात भागीदार आहे असे कडक ताशेरे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ओढले. कोर्टाने आता संपूर्ण ठाणे शहरातील जाहिरात फलकांबाबत काय कारवाई करणार आहात याचे शपथपत्र पुढील तारखे आधी देण्यास सांगितले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -