Thursday, March 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPune: पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना डंपरने चिरडले, ३ जणांचा जागीच मृत्यू

Pune: पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना डंपरने चिरडले, ३ जणांचा जागीच मृत्यू

पुणे: पुण्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. येथे फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना डंपरने चिरडले. त्यात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. यात २ मुले आणि एका व्यक्तीचा समावेश आहे. यासोबतच ६ जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना वाघोळीच्या केसनंद फाट्याजवळ घडली. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही अपघाताची दुर्देवी घटना घडलीय. यावेळी डंपरचा चालक नशेत होता अशी माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

फुटपाथवर लोकांना चिरडत गेला डंपर

या अपघातात जखमी झालेले सर्व मजूर आहेत. ते रविवारी रात्रीच कामाच्या निमित्ताने अमरावती येथून आले होते. या फुटपाथवर एकूण १२ जण झोपले होते. तर इतर लोक फुटपाथच्या बाजूला एका झोपडीत झोपले होते. यावेळी भरधाव डंपर फुटपाथवर चढला आणि लोकांना चिरडत गेला.

आरोपी डंपर ड्रायव्हरला अटक

जेव्हा ओरडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. त्यानंतर तातडीने पोलिसांना खबर देण्यात आली. दारूच्या नशेत असलेल्या ड्रायव्हरला पुणे पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर केस दाखल करण्यात आली आहे.

Mumbai News : कुर्ला स्थानक परिसर झाला मोकळा; अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई!

काहीच दिवसांपूर्वी घडला होता अपघात

याच महिन्यात काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये झालेल्या रस्ते अपघातात दोन तरूणांचा मृत्यू झाला होता. तर दोनजण गंभीररित्या जखमी झाले होते. हा अपघात इंदापूरमध्ये घडला होता. यावेळी बारामती येथून भिगवणला जात असलेल्या कारला अपघात झाला होता. या कारमधून ४ जण प्रवास करत होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -