
पिलीभीत : उत्तरप्रदेशच्या पिलीभीत येथे आज, सोमवारी पहाटे झालेल्या चकमकीत पाकिस्तान पुरस्कृत ३ खालिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. गुरविंदर सिंग, वीरेंद्र सिंग आणि जसप्रीत सिंग उर्फ प्रताप सिंग अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. त्यांच्यावर पंजाबच्या गुरुदासपूर येथील पोलिस चौकीवर बॉम्ब हल्ला केल्याचा आरोप होता. पंजाब आणि उत्तरप्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केलीय.

R. Ashwin : आर अश्विनच्या निवृत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भावनिक पत्र
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरूद्धची तिसरी कसोटी संपल्यानंतर भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निर्णयाने ...
यासंदर्भातील माहितीनुसार मारल्या गेलेले तिन्ही दहशतवादी खलिस्तान कमांडो फोर्स या बंदी असलेल्या संघटनेशी संबंधित होते. पंजाब पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत त्यांना ठार करण्यात आले. या दहशतवाद्यांनी पंजाबमधील गुरुदासपूर येथील पोलीस चौकीवर हल्ला केला होता. या प्रकरणी तिघेही पोलिसांना हवे होते. त्यांच्याकडील २ एके-47 रायफल, २ पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. पंजाब पोलिसांच्या एका पथकाने पिलीभीत पोलिसांना पुरनपूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत तीन खलिस्तानी दहशतवादी असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली. पुरणपूर येथे तिघेजण संशयास्पद वस्तूंसह असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींनी घेरले. या कारवाईदरम्यान आरोपींनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. त्याला पंजाब पोलिस आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात तिघेही ठार झाले. पंजाब पोलिसांच्या पथकाने त्यांच्या परदेशी कनेक्शनविषयी माहिती दिली होती. या संपूर्ण घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याचे पिलीभीत पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी ट्विटर (एक्स) पोस्टमध्ये सांगितले की, "उत्तर प्रदेश आणि पंजाब पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पाक पुरस्कृत खलिस्तान जिंदाबाद फोर्स (केझेडएफ) दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. या संयुक्त कारवाईदरम्यान पोलिस आणि तीन मॉड्यूल सदस्य यांच्यात चकमक झाली. या दहशतवादी मॉड्युलचा गुरदासपूरमधील पोलीस चौकीवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात सहभाग आहे. यातील जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी पुरणपूर येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. त्यांच्याकडून २ एके रायफल्स आणि २ ग्लॉक पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.