Saturday, March 15, 2025
Homeताज्या घडामोडीAccident: भरधाव टँकरची धडक बसल्याने २ जण जागीच ठार

Accident: भरधाव टँकरची धडक बसल्याने २ जण जागीच ठार

जळगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने मोटार सायकलला दिलेल्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले. मोटारसायकलला धडक दिल्यानंतर फरार झाला. सदर अपघात अमळनेर नाका जवळील हॉटेल जत्राजवळ झाला. दरम्यान, अपघात झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्तारोको आंदोलन करून महामार्ग रोखून धरला होता.

दरम्यान, अपघातस्थळी संतप्त जमावाने टायर जाळून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. संबंधित अधिकारी जोपर्यंत घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

राजेंद्र भिला भोई (वय ४६, रा. एरंडोल) आणि दीपक रामकृष्ण भोई (वय ४४, रा. शिरसोली ता. जळगाव) हे दोघे मोटार सायकल क्रमांक एम. एच. १९ बी. पी. २०७३ ने जात असतांना जळगावकडून पारोळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिल्यामुळे एक जण जागीच ठार झाले तर, एक जण गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेत असतांना त्यांचा मृत्यू झाला.

अपघातात मयत झालेले दोघेही जवळचे नातेवाईक असून राजेंद्र भोई हे जैन इरिगेशनमध्ये कामाला होते. नवीन बसस्थानकापासून केवळ पाचशे मीटर अंतरावर अपघात झाल्यामुळे नागरिकांनी अपघात स्थळी मोठी गर्दी करून मदत कार्य सुरु केले. यापूर्वी देखील याच ठिकाणी अनेकवेळा अपघात झाले असून सात ते आठ निरपराध जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याठिकाणी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी यासाठी यापूर्वी नागरिकांनी अनेकवेळा नागरिकांनी आंदोलन केले होते.

न्हाईच्या अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासन देवून कोणतीही उपाययोजना केली नाही. अपघात झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरु केले. रस्त्यावर टायर जाळून निषेध करण्यात आला. महामार्गावरच अवजड वाहन आडवे लाऊन वाहतूक रोखून धरली.

रास्तारोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, दशरथ महाजन, योगेश महाजन, गजानन महाजन, मनोज मराठे यांचेसह हजारो नागरिकांनी जोपर्यंत संबंधित अधिकारी घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही अशी भूमिका घेतली. याठिकाणी यापूर्वीदेखील अनेकवेळा अपघात झाले असून अपघाती जागा म्हणून या जागेची ओळख निर्माण झाली आहे.

अमळनेर नाका येथून नवीन वसाहतींमध्ये येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. एक महिन्यापूर्वी याच ठिकाणी अपघात होऊन एका युवक ठार झाला होता. राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाका परिसरात अंडरपास करण्यात यावा अथवा उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -