Monday, September 15, 2025

Celebrity Master Chef Show : 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' शो मध्ये दिसणार निक्की तांबोळींसह उषा नाडकर्णी

Celebrity Master Chef Show : 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' शो मध्ये दिसणार निक्की तांबोळींसह उषा नाडकर्णी

मुंबई : सोनी टीव्हीवरील 'मास्टर शेफ' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिएलिटी शो आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यातच आता ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’ तुमच्या भेटीला येणार आहे. या रिएलिटी शोचा प्रोमो नुकताच समोर आला असून, यामध्ये तुमचे आवडते कलाकार स्वयंपाक बनवताना दिसणार आहे. 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये कलाविश्वातील सेलिब्रिटी सहभागी होणार असून त्यांच्या कुकिंगने ते प्रेक्षकांची मनं जिंकणार आहेत. या शोचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.या प्रोमोमध्ये कलाकारांना आईस्क्रीम केक बनवण्याचं चॅलेंज देण्यात आल्याचं दिसत आहे. जे पाहून कलाकारांच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचं दिसत आहे. सोनी टीव्हीने ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’चा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये टीव्हीवरील अनेक प्रसिद्ध कलाकार दिसत आहेत.

या रिएलिटी शो मध्ये बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील सर्वात चर्चेत राहिलेल्या स्पर्धकांपैकी एक निक्की तांबोळी, प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी, तेजस्वी प्रकाश, फैसल मलिक, गौरव खन्ना, अर्चना गौतम, राजीव अदातिया, दीपिका कक्कड आणि कविता सिंह हे कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच या शोचं परिक्षण मास्टरशेफ इंडिया फेम रणवीर बरार आणि विकास खन्ना करणार आहेत. तर फराह खान हा शो होस्ट करणार आहे. हा शो कधी सुरू होणार आहे, याची तारीख उद्याप समोर आलेली नाही. मात्र, नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांना त्यांचे आवडते कलाकार रिएलिटी शोच्या माध्यमातून वेगवेगळे पदार्थ बनवताना पाहायला मिळतील.

Comments
Add Comment