Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Mumbai News : कुर्ला स्थानक परिसर झाला मोकळा; अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई!

Mumbai News : कुर्ला स्थानक परिसर झाला मोकळा; अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई!

मुंबई : महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाने कुर्ला येथील स. गो. बर्वे मार्ग, तसेच कुर्ला रेल्वेस्थानक (Kurla Station) मार्गावर कारवाई करत पदपथांवर उभारलेली अनधिकृत बांधकामे (Unauthorized Constructions) हटवली. वाहतुकीला होत असलेल्या अडथळ्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. त्या अनुषंगाने पालिकेने (Municipal Corporation) या मार्गावरील बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना दणका दिला. यावेळी दुकानाबाहेर बसवलेल्या लाद्या, अनधिकृत शेड, लाकडी बाकडे, दुकानाबाहेर लटकवलेले साहित्य यांच्यावर कारवाई करण्यात आली.



कुर्ल्यात ९ डिसेंबर रोजी झालेल्या बस अपघातामुळे एकूणच रेल्वे स्थानकाबाहेरील बजबजपुरी, पदपथावरील अतिक्रमणे, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिकेचा धूळ खात पडलेला प्रस्ताव, फेरीवाल्यांचा सुळसुळाट, रिक्षा चालकांची मनमानी असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर ही पालीकेकडून ही कारवाई करण्यात आली.

Comments
Add Comment