कर्जत : कर्जत तालुका हा फॉर्म हाऊस च हब असल तरी आज तालुक्यात विविध ठिकाणी मोठं मोठं गृहप्रकल्प उभे राहत आहेत. कर्जत तालुका हा निसर्ग पूर्ण सौंदर्याने नटलेला आहे. पावसाळ्यातील चार महिने तर हिरवाईचा साज चढलेला दिसतो. त्यामुळे येथे येणारा प्रत्येक पर्यटक कर्जतच्या प्रेमात पडतो. कर्जत मध्ये विविध फिल्म इंडस्ट्री,क्रिकेटर,संगीतकार आणि राजकीय नेत्यांची फॉर्म हाऊस घेतले आहेत. त्यामुळेच कर्जत कडे येणाऱ्या वाहतुकीचे प्रमाण देखील वाढले आहे. त्याचा थेट परिणाम कर्जत शहरातील मुख्य प्रवेशद्वार चार फाटा आणि श्रीराम पुल या मुख्य रस्त्यावर होताना दिसतो. त्यामुळे सध्या कर्जतच्या ट्रॅफिकचा प्रश्न (Karjat Traffic) ऐरणीवर आला आहे.
Kisan Credit Card : मासेमारी करणाऱ्यांनाही मिळणार किसान क्रेडीट कार्ड
कर्जत तालुक्यातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहे. परंतु चारही बाजूने येणारी वाहतूक यासाठी रेल्वे ब्रीज आणि श्रीराम पुल अपुरा पडत आहे. उल्हास नदीवरील जुन्या श्रीराम पुल अरुंद असल्याने या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणत वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या उल्हास नदीवरील श्रीराम पुलाच्या बाजूला आणखी एका नवीन ब्रीज चे काम गेल्या वर्षी पासून सुरू आहे. सदर काम पावसाळ्यात बंद असल्याने ते अर्धवट स्थितीत आहे. या नवीन पुलाचे चे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी होत आहे. सदर पुलाचे काम पूर्ण झाल्यास दहीवली येथील होणारी ट्रॅफिक कमी होऊ शकते.
कर्जत चे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या चार फाटा येथील रेल्वे पूल देखील अरुंद असल्यानं शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी तर हमखास ट्रॅफिक होत असते. या ट्रॅफिक मुळे कधी कधी रुग्णवाहिका देखील अडकून पडतात. सायंकाळी तर जड वाहतुकीच्या गाड्या मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने त्याचा थेट परिणाम या ट्रॅफिक वर होताना दिसतो. श्रीराम पुल येथील दोन्ही दिशेला रस्ता रुंदीकरण झाल्याने दोन्ही बाजूने तीन तीन लेन करून गाड्या येत असतात परंतु श्रीराम पुलावरून फक्त दोन मोठ्या गाड्या जाऊ शकतील इतकाच रुंद असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. कर्जत चार फाटा रस्त्यावर देखील वाहतूक कोंडी होत असल्याने या ठिकाणी संबंधित विभागाने सिग्नल यंत्रणा बसविल्यास काही प्रमाणत वाहतूक सुरळीत हुऊ शकते.
सुट्टीच्या कालावधीत ट्रॅफिक सोडविणे म्हणजे डोके दुखी
शनिवार, रविवार आणि लागोपाठ सुट्टीचे दिवस असेल तर ट्रॅफिक सोडविणे म्हणजे पोलिस वाहतूक कर्मचाऱ्यांची डोके दुखी ठरते. तसेच कर्जत चौक रस्ता रुंदीकरणाच्या काम गेली दोन वर्षांपासून सुरू आहे .सदर काम धीम्या गतीने सुरू असल्याने अर्धवट असलेल्या रस्त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. श्रीराम पुल येथील नव्याने सुरू असलेल्या पुलाचे काम पूर्ण झाले आणि चार फाटा येथील आणखी एक नवीन रेल्वे पुल बांधण्यात आला तर कर्जतच्या ट्रॅफिकचा प्रश्न मार्गी लागू शकतो.