Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘अटॅचमेंटकडून डिटॅचमेंटकडे’

‘अटॅचमेंटकडून डिटॅचमेंटकडे’

डाॅ. स्वाती गानू

रेवाने फोन केला खरा. सोहमला पण चार वेळा रिंग झाली तसा फोन बंद केला. तिला वाटलं कुणास ठाऊक ऑफिसच्या कामात असेल तर वैतागेल आपल्यावर मनातल्या मनात. आई कधीही फोन करते असा विचार करत असेल का तो? फोन करताना तिला अशी धाकधूक नेहमी वाटायची. त्यात जर त्याने फोन उचलला नाही किंवा काॅल बॅक केला नाही, मेसेजला उत्तर दिले नाही की मन उदास व्हायचे. आपण सोहमवर स्वतःला लादतोय का असे तिला वाटायचे. मग ती अपराधी भावनेने अक्षरशः मिटून जायची. पण मनातले दुःख ठसठसत राहायचे. तिला कळायचे नाही की मुलाला शिकवण्यात, संस्कार करण्यात, सवयी लावण्यात आपण कुठे कमी पडलो का? तिच्या मनातले गिल्ट, नाकारले जाणे हे अलीकडे सहन करण्यापलीकडे गेले होते.

बहुतेक आया या मनोवस्थेतून जातात. आपली मुले आपल्याशी रेग्यूलरली संपर्कात नाहीत, त्यांना आपली पर्वा नाही, केअरिंग, कन्सर्नमध्ये तर खूपच कमी पडताहेत हे कोणाला धड सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. साधारणतः मुले मोठी झाली की आई-वडील हे दुय्यम होतात. मुलांच्या आयुष्यात काॅलेज, मित्र-मैत्रिणी, करिअर, कुलीगनंतरच्या टप्प्यात बायको, तिच्या घरचे लोक, स्वतःचे असणारे कुटुंब ही फर्स्ट प्रायोरिटी असते. आपोआपच वेळ देताना, काळजी घेताना, जबाबदारी घेताना मुले दुर्दैवाने दुर्लक्ष करतात. अवघड जागेचे दुखणे अशी आई-वडिलांची परिस्थिती असते. पुरुष आपल्या भावना खूप संयमाने हाताळतात पण स्त्रिया भावुक असतात त्यांना हा त्रास अधिक होतो.

मग असा त्रास करून घेत राहावा का?
दुःख होते, वाईट वाटते पण आधी वस्तुस्थिती ॲक्सेप्ट करायला हवी की हो, मुलांसाठी जो वेळ द्यायला हवा होता आम्ही दोघांनी, तो आम्ही आई-बाबा या नात्याने दिलाय. शक्य होता तेवढा खर्च केला त्यांच्या शिक्षणासाठी, यशस्वी झाले तेव्हा कौतुक, फेल्युअर झाले तेव्हा आधारही दिला. चुकले तेव्हा माफ केले, समज दिली, वेळप्रसंगी धाकही दाखवला. त्यांच्या आनंदात सुखी झालो, दुःखात व्याकुळ झालो आणि आज जर मुले आपल्यापासून लांब जाताहेत तर जबरदस्तीने त्यांना जवळ आणणे फार सुखाचे ठरत नाही. नाती अशीच असतात गुंतागुंतीची. अटॅचमेंट लवकर होते. डिटॅच होणे सोपे नसते.

१) म्हणूनच वास्तव मान्य करणे पहिली स्टेप आहे.
२) आपण आपली भूमिका नीट पार पाडली आहे म्हणून अपराधीपण नको ही दुसरी पायरी.
३) मूल मोठे झाले आहे. जबाबदार आहे. त्याचं कुटुंब तो नीट सांभाळेल ही खात्री ठेवणं ही तिसरी स्टेप.
४) त्याचे आपल्यावरचे प्रेम कमी झाले आहे हे खरे नाही. मनाचा खेळ करत बसल्याने फक्त आपल्याला दुःख होते.
५) स्पष्ट बोलून आपल्याला वाटणारी भावना व्यक्त करायला हरकत नाही; पण त्यामुळे तुमचे मुलांशी असणारे संबंध तणावपूर्ण होतील ही भीती ठेवून जगणे त्रासदायक आहे. दोनपैकी एकच स्टॅन्ड घेता येतो. मधल्यामध्ये लोंबकळत राहण्याने मन फक्त दुःखी होते हे कटू सत्य आहे.
६) मुले अशी वागतात यात तुमची अजिबात चूक नाही. लोक काय म्हणतील याचे टेन्शन घेण्यात फार अर्थ नाही.
७) दोन्ही टोकांचा सुवर्णमध्य काढता आला तर उत्तमच, पण स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका.
८) तुम्ही असा स्टँड घेऊन मुलांशी चुकीचे वागत नाही आहात, तर व्यक्तीऐवजी परिस्थितीनुसार स्वतःत बदल करता आहात.
९) मुलांना जेव्हा गरज असेल तेव्हा जरूर मदत करता येईल. कारण डिटॅचमेन्ट म्हणजे आपण समोरच्याची केअर न
करणे ठरत नाही. उलट ते स्वतःची केअर करणे आहे.
खरं तर नात्याचे धागे जितके जुने तितकी त्याची वीण अधिक घट्ट होते असे म्हणतात; पण काही वेळेस असे न होता दुरावा निर्माण होतो. अंतर वाढत जाते, पण सत्य स्वीकारणे हेच शहाणपण आहे. ‘हेल्दी डिटॅचमेंट’ खूप उपकारक असते. अटॅचमेंटमध्ये ‘ओनरशिप’, मालकी असण्याचा आविर्भाव असतो, पण डिटॅचमेंटमध्ये असते ‘स्वातंत्र्य’.
एक चांगली गोष्ट शिकता येईल डिटॅचमेंटमधून की

Detachment from few things might helps you individual to have a hint of your self worth.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -