Tuesday, May 6, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Kisan Credit Card : मासेमारी करणाऱ्यांनाही मिळणार किसान क्रेडीट कार्ड

Kisan Credit Card : मासेमारी करणाऱ्यांनाही मिळणार किसान क्रेडीट कार्ड

छत्रपती संभाजीनगर : मासेमारी करणारे (Fisherman) मच्छिमार, मत्स्यकास्तकार यांना किसान क्रेडीट कार्डची सुविधा (Kisan Credit Card) उपलब्ध करुन देण्यासाठी १५ मार्च २०२५ पर्यंत मोहिम राबविण्यात येत आहे. तसेच प्रधानमंत्री मत्स्य किसान सह-समृद्धी योजनेअंतर्गत मत्स्य व्यावसायिक, मच्छिमार सहकारी संस्था इ. ची नोंदणीही करण्यात येत आहे.

नाव नोंदणी करण्यासाठी मत्स्य व्यावसायिक , मच्छिमार, सहकारी संस्था यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, छत्रपती संभाजीनगर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, दुग्धव्यवसाय विकास विभाग, पहिला माळा, दुध डेअरी सिग्नल जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ. मधुरिमा जाधव यांनी केले आहे.


Comments
Add Comment