Sunday, May 11, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Atal Bihari Wajpeyi : अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन साजरा करण्याचे आवाहन

Atal Bihari Wajpeyi : अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन साजरा करण्याचे आवाहन
नांदेड : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस २५ डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी सार्वजनिक सुट्टी असली तरी त्या दिवशी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपाचे आयुक्त, पोलीस अधिक्षक व जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना निर्देश देण्यात आले आहेत. हा दिवस सुशासन दिन म्हणून पाळण्यात यावा. या काळामध्ये वेगवेगळ्या शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात यावा.

जिल्हा प्रमुख व अधिनस्त कार्यालयांनी या सुशासन दिनाच्या निमित्ताने सेवा प्रशासनास उपयुक्त अशा बाबीसंदर्भात विविध उपक्रम राबविण्यात यावेत. जसे माहितीचा अधिकार प्रशिक्षण, प्रशासनातील उत्कृष्ट संकल्पनांचे सादरीकरण, सेवाविषयक प्रशिक्षण इ., तणाव मुक्ती व्यवस्थापन, सेवा हमी कायद्याची अंमलबजाणी, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
Comments
Add Comment