
मुंबई : व्हीजेआयटी कॉलेजतर्फे (VJTI College) आयोजित तंत्रज्ञान महोत्सव "टेक्नोव्हान्झा २०२४" (Technovanza 2024) यंदा २१ डिसेंबर रोजी माजी इस्रो अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आला. हा तीनदिवसीय महोत्सव २३ डिसेंबरपर्यंत सर्वांसाठी मोफत खुला आहे. टेक्नोव्हान्झामध्ये यंदा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे जी-१ बॉट आणि चतुष्पाद रोबोट (क्वाड्रुपेड बॉट). जी-१ बॉट हा एक अत्याधुनिक बुद्धिमत्तायुक्त रोबोट असून, तो विविध कार्यक्षमता आणि संवाद साधण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय, चतुष्पाद रोबोट ही टेक्नोव्हान्झाची आणखी एक खासियत आहे. तो अवघड भूभागांवर हालचाल करू शकतो आणि भविष्यकालीन संशोधनासाठी महत्त्वाचा ठरणारा तांत्रिक शोध आहे.

इस्त्रोच्या शास्त्रज्ञांपुढे असेल मोठी आव्हानात्मक जबाबदारी बंगळुरू : भारत प्रथमच स्वदेशी रॉकेटच्या (India indigenous rocket) माध्यमातून अंतराळात जैविक प्रयोग ...
तंत्रज्ञान आणि नवसंशोधनाबाबत आवड असलेल्या प्रत्येकासाठी टेक्नोव्हान्झा हा एक सुवर्णसंधी आहे. येथे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना तंत्रज्ञानाच्या अद्ययावत गोष्टी अनुभवण्याचा विशेष अनुभव मिळेल.
टेक्नोव्हान्झामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांचे सादरीकरण, रोबोटिक्स वर्कशॉप्स, आणि अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या या महोत्सवाला भेट द्या आणि नव्या जगातील तंत्रज्ञानाचा अनुभव घ्या. आपली उपस्थिती हीच टेक्नोव्हान्झाच्या यशासाठी महत्त्वाची ठरेल.