Saturday, March 15, 2025
Homeक्रीडाTechnovanza 2024 : जगभरातील अत्याधुनिक रोबोट्स आता मुंबईत

Technovanza 2024 : जगभरातील अत्याधुनिक रोबोट्स आता मुंबईत

माध्यम प्रायोजक प्रहार

मुंबई : २१ ते २३ डिसेंबर २०२४ व्हीजेटीआय मुंबईच्या प्रतिष्ठित टेक्नोव्हांझा २०२४ महोत्सवात (Technovanza 2024) तंत्रज्ञानाचे भविष्यातील चमत्कार अनुभवण्याची संधी सर्वांसाठी खुली आहे. २१ ते २३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात जगभरातील अत्याधुनिक रोबोट्स आणि तंत्रज्ञानाचे दिग्दर्शन होणार आहे. भारताचा सर्वात उंच ह्युमनॉइड रोबो, ज्याचे एआय कौशल्य आणि अभियांत्रिकी पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित होतील. हे तंत्रज्ञानाचे अद्भुत नमुने सर्व वयोगटांसाठी मोफत प्रवेश करून पाहता येणार आहेत.

मुख्य आकर्षण : आयआयटी बॉम्बेच्या टेकफेस्टमध्ये प्रेक्षकांना थक्क करणारे जागतिक दर्जाचे रोबोट्स आता व्हीजेटीआयच्या कॅम्पसवर मोफत पाहता येतील. या रोबोट्समध्ये चीनमधून खास आणलेले, अद्भुत कार्यक्षमतेचे नमुने असलेले युनिट्री रोबोटिक्स आणि इंड्रो यांचा समावेश आहे.

युनिट्री रोबोटिक्स : हे रोबोट्स अत्यंत गतिमान असून लांब उड्या मारणे, वेगाने हालचाली करणे आणि अडथळे पार करणे यासारखे अनेक अद्वितीय स्टंट्स सादर करतात.

कार्यशाळा : ड्रोन तंत्रज्ञान, फायनान्स, एएनएसवायएस अशा क्षेत्रांतील कौशल्यविकासाच्या कार्यशाळांसाठी नोंदणी करा.

प्रवेश आणि नोंदणी

प्रदर्शन आणि ऑटो शो : सर्वांसाठी मोफत प्रवेश.

कार्यशाळा आणि स्पर्धा : नोंदणी आवश्यक.

नोंदणीसाठी

गेट पास : https://www.technovanza.org/#/exhibition or scan the QR code

तारीख : २१, २२ आणि २३ डिसेबर २०२४, स.९.०० ते सायं. ५.००

ठिकाण : व्हीजेटीआय कॅम्पस, माटुंगा, मुंबई

स्पर्धा : हॅकाथॉन, रोबो वॉर्स, मॉन्स्टर अरेना आणि इतर रोमांचक स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे जिंका! ७ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष स्कूल कप आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये भविष्यातील तंत्रज्ञानाच्या संकल्पना प्रत्यक्षात आणता येतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -