बीड : केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्येमुळे गावातील सर्वसामान्य माणसांना धक्का बसला आहे. बीड मधील ही घटना अंगावर काटा आणणारी आहे. विधानसभेतही हा विषय चर्चेचा मुद्दा ठरला. संतोष देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्न करत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख यांच्या परिवाराची शरद पवार यांनी भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी देशमुख यांच्या परिवारासाठी मोठी घोषणा केलीये. मयत संतोष देशमुखांच्या मुलीचा शिक्षणाचा खर्च करेन असे आश्वासन पवार यांनी देशमुख कुटुंबियांना दिले आहे.
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीक्षाभूमीला दिली भेट
देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची कॉलेजपर्यंतची जबाबदारी आम्ही घेत असल्याचं पवारांनी जाहीरपणे सांगितलं. देशमुख यांच्या मुलीला बारामतीच्या वस्तिगृहात पाठवा, तिच्या कॉलेजपर्यंतचे सर्व शिक्षण आम्ही करतो, त्यासोबतच या प्रकरणाच्या खोलात जात मुख्य सूत्रधाराला तातडीने धडा शिकवावा असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.