Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीKazan Drone Attack : रशियात ९/११ हल्ल्याची पुनरावृत्ती! कझानमधील सहा निवासी इमारतींवर...

Kazan Drone Attack : रशियात ९/११ हल्ल्याची पुनरावृत्ती! कझानमधील सहा निवासी इमारतींवर ड्रोन हल्ले

मॉस्को : रशियाची (Russia) तिसरी राजधानी म्हणून ओळख असलेल्या कझान शहरात भीषण हल्ला (Kazan Drone Attack) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कझान शहरात एकामागून एक असे तीन सीरियल ड्रोन हल्ले (यूएव्ही) करण्यात आल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात तीन उंच इमारतींना लक्ष्य करण्यात आले असून यामध्ये इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जगभरात हाहाकार उडाला आहे.

Nitesh Rane : मच्छर मारण्यासाठी रेकीची गरज नाही, गुडनाईट कॉईल पुरेसं!

उंच इमारतींवर आठ ड्रोन हल्ले

रशियातील मॉस्कोच्या पूर्वेला ८०० किमी अंतरावर असलेल्या कझानमधील तीन निवासी उंच इमारतींवर आठ ड्रोन हल्ले झाले आहेत. या हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले असून अद्यापही जीवितहानी झाल्याचे समोर आले नाही. या हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आले आहे. यामध्ये ड्रोन एका उंच इमारतीला धडकाला असून आगीचा भडका उडाल्याचे दिसून येत आहे. तर, एक ड्रोन निकामी केल्याचे रशियाचे म्हणणे आहे.

कझानमधील विमानतळे तातडीने बंद

रशियातून समोर आलेल्या माहितीवरून या इमारतींमध्ये रहिवासी राहत असल्याचा अंदाज आहे. खबरदारी म्हणून जवळपासच्या उंच इमारतीही रिकामी करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी रशियातील कझान शहरातील विमानतळावरही उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. (Kazan Drone Attack)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -