Wednesday, July 2, 2025

बहिणीसोबत बोलला म्हणून कोयत्याने केली हत्या

बहिणीसोबत बोलला म्हणून कोयत्याने केली हत्या

पुणे : बारामती येथे आत्येबहिणी सोबत बोलण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाचा धारदार कोयत्याने हल्ला करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अवघ्या १३ तासात अटक केली आहे.


बारामती शहरातील प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी कडून टीसी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर १९ डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास एका युवकाचा धारदार कोयत्याने जीव घेणा हल्ला करून खून करण्यात आला होता. यात अनिकेत सदाशिव गजाकस (वय, २३ रा. देसाई इस्टेट बारामती) या २३ वर्षीय युवकाचा खून झाला होता. या प्रकरणातील नंदकिशोर पंजाबराव अंभोरे, (रा शेळके वस्ती तांदुळवाडी, बारामती) महेश नंदकुमार खंडाळे (रा. यदुपाटील नगर, तांदुळवाडी, बारामती), संग्राम दत्तात्रेय खंडाळे (रा. शेळकेवस्ती, तांदुळवाडी, बारामती) यांना पोलिसांनी १३ तासांत अटक केली आहे.



घटनेची अधिक माहिती अशी की, मयत अनिकेत व आरोपींमध्ये याआधीही आपापसात वाद झाले होते. मयत अनिकेत हा आरोपी नंदकिशोर अंभोरे याच्या आत्येबहिणी सोबत बोलण्याच्या कारणावरून वाद झाला होता. याचाच बदला घेण्यासाठी वरील तीनही आरोपींनी १९ डिसेंबरच्या रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून येत अनिकेत याच्यावर कोयत्याने हल्ला चढवत ठार केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >