Friday, October 24, 2025
Happy Diwali

PM Modi : पंतप्रधानांच्या हस्ते होणार मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

PM Modi : पंतप्रधानांच्या हस्ते होणार मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

मुंबई : सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन २१ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी स्वीकृती दिल्याची माहिती शनिवारी स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी महामंडळाला दिल्याची माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी एका पत्रकाद्वारे दिली.

उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे स्थळ, स्वरूप, वेळ तसेच इतर रूपरेषा महामंडळ, संयोजक संस्था आणि स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीनंतर लवकरच जाहिर केली जाईल, असेही प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे.

आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि याच पार्श्वभूमीवर, मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद अशी ही बाब.

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… ही केवळ कविकल्पना नाही तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे, याचा प्रत्यय आपणास या ऐतिहासिक संमेलनातून येणार आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे, अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन `सरहद, पुणे`च्या पुढाकारातून याच भावनेतून आयोजित करण्यात आले आहे.

Comments
Add Comment