Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीST Bus Location : प्रवाशांसाठी गुुडन्यूज! लोकलप्रमाणे आता लालपरीचेही दिसणार लोकेशन

ST Bus Location : प्रवाशांसाठी गुुडन्यूज! लोकलप्रमाणे आता लालपरीचेही दिसणार लोकेशन

सोलापूर : चाकरमान्यांसह इतर प्रवासी प्रवास करण्यासाठी पहिली पसंती लालपरी म्हणजेच एसटी बसला (ST Bus) देतात. मात्र अनेकवेळा एसटी बस स्थानकावर बस येण्यास विलंब होतो. तर कधी पाहुणेमंडळी एसटी बसमधून प्रवास करत असताना त्यांचा फोनही लागत नाही. त्यामुळे एसटी बस नेमकी कुठे आहे असा प्रश्न सतावत असतो. मात्र आता या प्रश्नांना पुर्णविराम मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) नवी सविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे आता प्रवाशांना त्यांच्या एसटी बसचे लोकेशन (ST Bus Location) घरबसल्या पाहता येणार आहे. ही नवीन यंत्रणा नववर्षापासून सुरु होणार आहे.

Cold Wave : राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम राहणार

जीपीएस अ‍ॅपची सुविधा

आतापर्यंत महामंडळाच्या ताफ्यातील दहा हजार बसगाड्यांना ‘जीपीएस’ सिस्टिम बसविण्यात आली आहे. आता, त्या यंत्रेणीची सद्य:स्थिती काय, याची पडताळणी केली जात आहे. याशिवाय उर्वरित पाच हजार बसगाड्यांनाही ही यंत्रणा बसविली जाणार आहे. एसटी बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला किंवा काही अडचणीमुळे वेळेनुसार बस स्थानकावर पोचायला विलंब होत असल्यास त्याची माहिती देखील त्या अॅपद्वारे समजणार आहे.

व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिमची वैशिष्टे…

  • अ‍ॅन्ड्राईड मोबाईलमधील प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागणार महामंडळाचे ‘एमएसआरटीसी’ अॅप
  • महामंडळाची प्रत्येक बस कुठून किती वाजता निघेल व कधीपर्यंत नियोजित ठिकाणी पोचेल अॅपवरुन समजणार
  • गुगल मॅपवरुन समजणार बस कधीपर्यंत स्थानकावर येईल, त्यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागणार नाही
  • हात करूनही बस थांबली नाही, प्रवाशाने केलेल्या या तक्रारीची अॅपवरुन होईल खात्री
  • एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या नातेवाइकांचीही दूर होणार चिंता, त्यांनाही येणार वेळेचा अंदाज

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -