Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

One Sided Love Story : असलं प्रेम नकोचं बुवा! एकतर्फी प्रेमाने घेतला तरुणीचा नाहक बळी

One Sided Love Story : असलं प्रेम नकोचं बुवा! एकतर्फी प्रेमाने घेतला तरुणीचा नाहक बळी

उत्तरप्रदेश : एकतर्फी प्रेमाच्या अनेक गोष्टी आपण आजकाल ऐकतो मात्र उत्तरप्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंडच्या महोबा येथे एका प्रियसीने लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने घरात घुसून तिच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपीने कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देऊन पळ काढला. आरोपी मागील काही दिवसांपासून विद्यार्थिनीला सतत त्रास देत होता. मात्र, कुटुंबियांनी समाजाच्या भीतीने पोलिसात तक्रार दाखल केली नाही. आता या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय.


या घटनेनंतर मुलीचे वडील राकेश कुशवाह यांनी सांगितले की, आरोपी गेल्या दीड वर्षांपासून माझी मुलगी वंदना हिचा छळ करत होता. मात्र, बदनामीच्या भीतीने आम्ही पोलिसात तक्रार केली नाही. ज्यादिवशी ही घटना घडली, त्यावेळी आम्ही बाजारात गेलो होतो आणि वंदना तिच्या लहान बहिणीसोबत घरीच अभ्यास करत बसली होती. आरोपी हरिश्चंद्र हा आमच्या घरात थेट शस्त्र घेऊन घुसला होता. त्यावेळी तो वंदना हिच्यावर दबाव टाकत होता.



वंदनाने लग्नास नकार दिल्याने आरोपीने रागाच्या भरात तिच्यावर पिस्तुलाने गोळ्या झाडल्या. एक गोळी वंदनाच्या कंबरेजवळ लागली आणि ती रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, वंदनाला कमरेच्या खाली गोळी लागली आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला आम्ही झांसी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले. तिच्यावर पुढील उपचार हे सुरू आहेत. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत आहे. विद्यार्थिनीवर गोळीबार करून आरोपी फरार झालाय. थेट घरात घुसून गोळीबार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण बघायला मिळतंय.

Comments
Add Comment