मुंबई: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी १९-२० डिसेंबरच्या रात्री बँकॉकहून येणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ११ कोटीहून अधिक किंमतीचा गांजा जप्त केला. प्रवाशाला ११.३२२ किलोग्रॅम संशयित हायड्रोपोनिक गांज्यासह पकडण्यात आले. याची किंमत तब्बल ११.३२ कोटी रूपये आहे.
न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, कस्टम अधिकाऱ्यांनी गुप्त सूचनांच्या मदतीने प्रवाशाचे प्रोफाईलिंग केले आणि तपासादरम्यान प्रवाशाच्या ट्रॉली बॅगच्या आत व्हॅक्युम सील प्लास्टिक पाऊचमध्ये लपवलेले अवैध पदार्थ ताब्यात घेतले. हायड्रोपोनिक गांजा हा नशेचा पदार्थ आहे. याची बाजारात किंमत अधिक आहे.
मुंबई विमानतळावर सीमा शुक्ल विभागाने १८-१९ डिसेंबरदरम्यान सोन्याच्या तस्करींची दोन प्रकरणे पकडली. अधिकाऱ्यांनी एकूण २.०७३ किलो २४ कॅरेट सोने जप्त केले.मुंबईच्या कस्टम अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार १८-१९ डिसेंबरला मुंबईच्या CSMI एअरपोर्टवर अधिकाऱ्यांनी २ प्रकरणांमध्ये १.४८ कोटी रूपयांचे २.०७३ किलो सोने जप्त केले. सोने या प्रवाशांनी आपल्या शरीरात लपवले होते. तर दुसऱ्या प्रकरणात सोने एअरपोर्टवरील एका कर्मचाऱ्याकडूनच जप्त करण्यात आले. या प्रकरणात दोन लोकांना अटक करण्यात आली.
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…