बर्लिन: जर्मनीच्या मॅगडेबर्गमध्ये शुक्रवारी २० डिसेंबरला मोठा कार अपघात झाला. यात २ जणांचा मृत्यू झाला ६०हून अधिकजण जखमी झालेत. हा अपघात ख्रिसमस बाजारात घडला. येथे एका गर्दीच्या परिसरात एक कार घुसली आणि लोकांवर चढली. या प्रकरणी स्थानिक जर्मन पोलिसांनी सौदी अरेबियाच्या ५० वर्षीय डॉक्टरला अटक केली आहे. हा डॉक्टर कार चालवत होता. आधी या अपघातात ११ जण मारले गेल्याचे सांगितले होते मात्र नंतर अधिकाऱ्यांनी २ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली.
Graphic CCTV footage shows the heinous terror attack on the Christmas market in Magdeburg, Germany.
German citizens cannot share this video, otherwise they will be arrested because it likely shows an iIIegal migrant doing this.https://t.co/0Ql7ORqO5x
— Wall Street Mav (@WallStreetMav) December 20, 2024
मॅगडेबर्ग जर्मनीच्या सॅक्सोनी-एन्हाल्टची राजधानी आहे. येथे हा अपघात घडला. शहराचे प्रमुख रेनर हसेलॉफ यांनी सांगितले की आरोपी ड्रायव्हर जर्मनीत राहणारा होता. गेल्या २० वर्षांपासून तो येथे राहत होता. सध्याची स्थिती पाहता इतर कोणताही धोका नाही.
कारमधून नाही सापडली विस्फोटके
पोलिसांनी वाहनामध्ये विस्फोटके असण्याची शक्यता व्यक्त केली होती मात्र तपासादरम्यान कोणतीही विस्फोटके मिळाली नाहीत. या भयावह घटनेच्या वेळेस पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि मार्केटमध्ये पोहोचत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले की पोलिसांनी संशयित हल्लेखोराला अटक केली आहे.
जर्मनीत ८ वर्षांपूर्वी झाला होता हल्ला
८ वर्षांपूर्वीही बर्लिनच्या ख्रिसमस मार्केटमध्ये अशाच प्रकारचा अपघात घडला होता. यावेळेस एका ट्रकने गर्दीला उडवले होते. यात १२ जणांचा मृत्यू झाला होता.