Friday, February 7, 2025
Homeताज्या घडामोडीVirat Anushka : विराट अनुष्का लवकरच भारत सोडून लंडनला शिफ्ट होणार

Virat Anushka : विराट अनुष्का लवकरच भारत सोडून लंडनला शिफ्ट होणार

कॅनबेरा : भारतीय संघातील नामवंत क्रिकेटपटू विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. सध्या तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळत असून तिसऱ्या कसोटीत तो फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. याचदरम्यान विराट कोहली भारत सोडणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. विराट कोहली हा पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन मुलांसह लंडनला शिफ्ट होणार आहे, अशी माहिती आता विराट कोहलीचे लहानपणीचे क्रिकेट प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी दिली आहे.

Oops! मांजाने कापला मुलाचा कान

विराट आणि अनुष्का लंडनला शिफ्ट होणार याची चर्चा खूप दिवसांपासून सुरु आहे, मात्र याबाबत ठोस आणि अधिक माहिती समोर आली नव्हती. मात्र प्रथमच याबाबत कोहलीच्या जवळच्या व्यक्तीने खुलासा केला केला आहे. एका मुलाखती दम्यान प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना विराट कोहली कायमचा भारत सोडून परदेशात राहण्याचा विचार करत आहे का? यावर उत्तर देताना प्रशिक्षक म्हणाले, “हो, विराट आपल्या मुलांसह आणि पत्नी अनुष्का सह लंडनमध्ये शिफ्ट होण्याचं प्लॅनिंग करत आहे. तो लवकरच भारत सोडून तिथे शिफ्ट होणार आहे. कोहली सध्या क्रिकेट व्यतिरिक्त जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवत आहे. तसेच पुढे बोलताना प्रशिक्षक म्हणाले ककी, विराट अजूनही तंदुरुस्त आहे आणि निवृत्ती घेण्याचे त्याचे वय झालेले नाही. मला वाटते की तो आणखी पाच वर्षे खेळेल. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात तो भारताकडून नक्कीच खेळेल. मी त्याला गेल्या २६ वर्षांपासून ओळखतो आणि म्हणूनच मी म्हणू शकतो की त्याच्यामध्ये अजूनही खूप क्रिकेट शिल्लक आहे.

विराट कोहली सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळत आहे. मालिकेतील पहिल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये मोठी खेळी म्हणून त्याच्या बॅटमधून फक्त १  शतक झळकले आहे. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने नाबाद १००  धावा केल्या. या एका शतकासह त्याने ३  कसोटी सामन्यांच्या ५  डावात १२६  धावा केल्या आहेत. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७  साली विराट-अनुष्काने लग्न केलं. २०२१ मध्ये त्यांची मुलगी वामिकाचा जन्म झाला तर यावर्षी फेब्रुवारीमध्ये
(२०२४) मुलगा अकायचा जन्म झाला. त्यानंतर ते दोघं बऱ्याच वेळेस लंडनमध्ये दिसले आहेत. त्यामुळे लवकरच विराट भारत सोडून तिथे स्थायिक होणार आहे, अशी मोठी माहिती राजकुमार शर्मा यांनी दिली. त्यामुळे विराटच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -