
मुंबई: अनेकदा लोक एकमेकांकडून फुकट वस्तू घेतात. वास्तुशास्त्रात सर्व गोष्टी फुकटमध्ये घेणे योग्य नसल्याचे सांगितले आहे. असे केल्याने जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.
वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे ज्या वस्तू जवळच्या व्यक्तींकडून कधीही फुकट घेणे चांगले मानले जात नाही. वास्तुशास्त्रानुसार कधीही मीठ कोणाकडून फुकट घेऊ नये. मीठाचा संबंध शनीशी सांगितला आहे.
जर मीठ तुम्ही कधीही फुकट घेत असाल तर त्याच्या बदली दुसरी कोणतीतरी वस्तू दिली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार जर मी फुकटात घेत असाल तर जीवनात रोग आणि कर्जाची समस्या वाढू शकते.
वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीने सुई कधीही फुकट घेऊ नये. तसेच या सुईचा वापरही करू नये. कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीकडून फुकटता सुई घेतल्याने जीवनात नकारात्मकता वाढू लागते. तसेच घरच्यांसोबतचे प्रेमसंबंधही कमी होतात.
वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीला रुमालही कधी कोणाकडून फुकट घेतला नाही पाहिजे. तसेच इतर कोणाचाही रूमालही वापरू नये. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही फुकटात घेतलेला रूमाल वापरत असाल तर यामुळे त्या दोन व्यक्तींमध्ये वाद होऊ शकतात.