सोलापूर : प्रेमभंग झाल्याच्या नैराश्यातून जेसीबी ऑपरेटर तरुणाने इन्स्टाग्रामवर स्वतःच्या फोटोला श्रद्धांजली वाहून दोरीने पळसाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. कटफळ (ता. सांगोला) येथील फॉरेस्टमधील पाझर तलावाजवळ उघडकीस आली. संजय भगवान केदार (वय २५, रा. लातूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
गार्डी येथील फाटे याच्याकडे असलेल्या जेसीबी मशीनवर संजय केदार हा ऑपरेटर (चालक) म्हणून कामास होता. दरम्यान संजयने स्वतःच्या मोबाइलवरून मालक फाटे यांच्या मोबाइलवर फोन करून माझे एका मुलीवर प्रेम आहे, ती मला लग्नास नकार देत असल्यामुळे आता माझी जगण्याची इच्छा संपल्याचे सांगून त्याने फोन बंद केला.
त्यानंतर संजयने त्यांच्या व्हॉट्सअॅपवर त्याचे लोकेशनही पाठविले. त्यानंतर फाटे व त्यांचा मित्रांनी मिळून संजयला शोधत त्याने पाठवलेल्या लोकेशनवर गेले. कटफळ शिवारातील दुधाळवाडी फॉरेस्टमध्ये तो वापरत असलेली दुचाकी मिळून आली.