Oops! मांजाने कापला मुलाचा कान

  143

नाशिक : नायलॉन मांजाने दुचाकीस्‍वाराचा गळा चिरल्याची घटना ताजी असतानाच आता या घातक नायलॉन मांजाने एका बालकाचा कान कापल्याची (Oops) धक्कादायक घटना येवल्यात घडली आहे.


चिनी व नायलॉनच्या मांजावर बंदी घातलेली असतानाही त्याचा राज्यात सर्रासपणे वापर सुरू आहे. सध्या मकरसंक्रांतीचा सण जवळ येत आहे. त्यानिमित्त पतंगबाजीला सर्वत्र उधाण आले आहे. पतंगांचा खेळ पक्ष्यांप्रमाणे मानवासाठीही जीवघेणा ठरू लागला आहे. त्यासाठी प्रतिबंध असलेल्या नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू असून, याचा वापर घातक आहे.


या मांजामुळे शहरात दुर्घटना घडल्याचे प्रकार याआधीही घडले होते. तरीही या मांजाची विक्री आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर पोलीस व महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. मांजामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला असून, या घटनेनंतर तरी प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.



येवला शहर व परिसरात नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू असून, निमगाव मढ येथे तलाठी म्हणून कार्यरत असणाऱ्या मनीषा इघवे या मुलगा सार्थक (वय ७) याला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घेऊन जात होत्या. यावेळी शहरातील फत्तेबुरुज नाका परिसरात सार्थकच्या डोक्यात मांजा अडकल्याने त्याचा कान कापला गेला. त्याला जखमी अवस्थेत येथील एका खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले असून कानाला झालेली जखम मोठी असल्याने १२ टाके पडले असल्याची माहिती डॉ. स्वप्निल शहा दिली.


या घटनेनंतर नायलॉन मांजावरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी प्रशासन केव्हा करणार, असा प्रश्न परिसरातीन नागरिकांनी उपस्थित केला आहे.


नायलॉन मांजाने दुचाकीस्‍वाराचा गळा चिरला; विक्रेत्‍यावर कारवाई


याआधी दोन डिसेंबर रोजी यवतमाळमधील भोसा परिसरात दुचाकीने शेतात जात असलेल्या प्रशांत रामचंद्र राऊत यांचा मांजामुळे गळा चिरल्याची घटना घडली. सुदैवाने यात दुचाकीस्वाराचा जीव वाचला. यानंतर नायलॉन मांज्‍या विकणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्यात आली.


दरम्यान, दरवर्षीच असे अपघात घडत असतात. त्यानंतरही स्थानिक नगरपालिका प्रशासन, पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा पथक कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. आतापर्यंत एकही कारवाई पोलिसांनी केली नाही. बंद असलेला मांजा विक्री होत असून, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांना जाग येते. शहरात अशी घटना घडली की मग कारवाईचा देखावा दरवर्षी केला जातो.

Comments
Add Comment

Vastu Tips: सायंकाळी किंवा रात्री दान करू नयेत या गोष्टी, अन्यथा देवी लक्ष्मी होते नाराज!

मुंबई : हिंदू धर्मग्रंथ आणि वास्तुशास्त्रानुसार, काही विशिष्ट गोष्टी सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या वेळी दान

दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप

मुंबई : दीड दिवसांच्या गणरायांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. गणरायाच्या निरोपाला रिमझिम पावसाच्या सरी

डॉकयार्ड रेल्वे स्टेशन तरुण मृतदेह प्रकरणी तिघांना अटक

मुंबई (प्रतिनिधी) : डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळील माझगाव परिसरात मंगळवारी एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ

मुंबई : २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी

मुस्लिम असल्याने मला ट्रोल करतात : शमी

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अगामी आशिया चषकासाठी निवड न झाल्याबद्दल

पीव्ही सिंधू बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलमध्ये

पॅरिस : दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधूने बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर