Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीOops! मांजाने कापला मुलाचा कान

Oops! मांजाने कापला मुलाचा कान

नाशिक : नायलॉन मांजाने दुचाकीस्‍वाराचा गळा चिरल्याची घटना ताजी असतानाच आता या घातक नायलॉन मांजाने एका बालकाचा कान कापल्याची (Oops) धक्कादायक घटना येवल्यात घडली आहे.

चिनी व नायलॉनच्या मांजावर बंदी घातलेली असतानाही त्याचा राज्यात सर्रासपणे वापर सुरू आहे. सध्या मकरसंक्रांतीचा सण जवळ येत आहे. त्यानिमित्त पतंगबाजीला सर्वत्र उधाण आले आहे. पतंगांचा खेळ पक्ष्यांप्रमाणे मानवासाठीही जीवघेणा ठरू लागला आहे. त्यासाठी प्रतिबंध असलेल्या नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू असून, याचा वापर घातक आहे.

या मांजामुळे शहरात दुर्घटना घडल्याचे प्रकार याआधीही घडले होते. तरीही या मांजाची विक्री आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर पोलीस व महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. मांजामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला असून, या घटनेनंतर तरी प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

CAG Report : महाराष्ट्रात रस्ते बांधकामातील दिरंगाईमुळे २०३ कोटींचे नुकसान

येवला शहर व परिसरात नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू असून, निमगाव मढ येथे तलाठी म्हणून कार्यरत असणाऱ्या मनीषा इघवे या मुलगा सार्थक (वय ७) याला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घेऊन जात होत्या. यावेळी शहरातील फत्तेबुरुज नाका परिसरात सार्थकच्या डोक्यात मांजा अडकल्याने त्याचा कान कापला गेला. त्याला जखमी अवस्थेत येथील एका खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले असून कानाला झालेली जखम मोठी असल्याने १२ टाके पडले असल्याची माहिती डॉ. स्वप्निल शहा दिली.

या घटनेनंतर नायलॉन मांजावरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी प्रशासन केव्हा करणार, असा प्रश्न परिसरातीन नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नायलॉन मांजाने दुचाकीस्‍वाराचा गळा चिरला; विक्रेत्‍यावर कारवाई

याआधी दोन डिसेंबर रोजी यवतमाळमधील भोसा परिसरात दुचाकीने शेतात जात असलेल्या प्रशांत रामचंद्र राऊत यांचा मांजामुळे गळा चिरल्याची घटना घडली. सुदैवाने यात दुचाकीस्वाराचा जीव वाचला. यानंतर नायलॉन मांज्‍या विकणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्यात आली.

दरम्यान, दरवर्षीच असे अपघात घडत असतात. त्यानंतरही स्थानिक नगरपालिका प्रशासन, पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा पथक कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. आतापर्यंत एकही कारवाई पोलिसांनी केली नाही. बंद असलेला मांजा विक्री होत असून, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांना जाग येते. शहरात अशी घटना घडली की मग कारवाईचा देखावा दरवर्षी केला जातो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -