मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मुंबई – नागपूर दरम्यान विशेष गाड्या सोडण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांचा आता आरामदायी प्रवास होणार आहे.
Mahad MIDC : महाड स्फोटाच्या प्रकरणाची गंभीरता वाढली; जखमींचा आकडा ९ वर
कसे असेल वेळापत्रक?
- लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर साप्ताहिक विशेष (२ सेवा)
०२१३९ साप्ताहिक विशेष २१ डिसेंबर २०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. (१ सेवा)
०२१४० साप्ताहिक विशेष नागपूर येथून २१ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. (१ सेवा)
- थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
- संरचना : एक प्रथमसह -द्वितीय वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, ९ तृतीय वातानुकूलित, २ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी/चेअर कार, १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.
- आरक्षण : विशेष ट्रेन क्रमांक ०२१३९/०२१४० साठी विशेष शुल्कासह बुकिंग २० डिसेंबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेस्थळावर सुरू होईल. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा, असे सांगण्यात आले आहे.