नाशिक : नाशिक येथील सातपूर औद्योगिक वसाहतीमधील ज्योतिष स्ट्रक्चर कंपनीत आग लागल्याचे समोर आले आहे. ज्योतिष स्ट्रक्चर कंपनीतील एका प्लास्टिक टाकीला आग लागली असून परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आहेत. मेन्टेनन्सचे काम सुरू असल्याने ही आग लागली असल्याचे माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी संपूर्ण परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.