Thursday, May 8, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Health Tips : तुम्ही रात्रीची खरकटी भांडी तशीच बेसिनमध्ये ठेवता का? तर हे वाचा

Health Tips : तुम्ही रात्रीची खरकटी भांडी तशीच बेसिनमध्ये ठेवता का? तर हे वाचा

मुंबई: जर तुमच्या किचन आणि सिंकमध्ये रात्रभर खरकटी भांडी ठेवत असाल तर सावधान! यामुळे धोकादायक आजार होऊ शकतात. खरकटी भांडी न धुता बराच काळ तशीच ठेवली तर भांड्यांमध्ये बॅक्टेरिया निर्माण होतात. हे बॅक्टेरिया धुतल्यानंतरही साफ होत नाहीत. त्यामुळे ही खरकटी भांडी तुमच्या घरात आजार निर्माण करू शकतात.


किचनमध्ये जर बराच काळ भांडी तशीच राहिली तर भांड्यांवर साल्मोनेला, लिस्टेरिया आणि ई कोलायसारखे बॅक्टेरिया निर्माण होतात. हे बॅक्टेरिया भांडी साफ केल्यानंतरही तसेच राहता. याच भांड्यांमध्ये आपण जेवण वाढतो. त्यामुळे हे बॅक्टेरिया पोटात जातात. यामुळे अनेक आजारही होऊ शकतात. उलटी, पोटदुखी, डायरिया, अपचन हे आजार सतावता.


तसेच किचन, भांडी आणि सिंक साफ ठेवण्यात आळस करू नका. कारण या आळशीपणामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच फ्रीजमध्येही दीर्घकाळ ठेवलेले पदार्थ आजार निर्माण करू शकतात. थंडीच्या दिवसांत चुकीची खाण्याची पद्धत आपल्याला आजारी पाडू शकते. अधिक मीठ आणि साखरेचे पदार्थ खाल्ल्याने हाय बीपी आणि शुगरची समस्या सतावते.



भांड्यांवरील बॅक्टेरिया पोटात गेल्यास हे आजार सतावू शकतात


कमकुवत इम्युनिटी, उलटी आणि पोटदुखी, डायरिया, किडनी फेल होण्याचा धोका, अपचन
Comments
Add Comment