मुंबई : संजय दत्त (Sanjay Dutt) याचा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याचा ‘थ्री इडियट्स’ सिनेमांवर आजही प्रेक्षक भरभरुन प्रेम देतात. आता यातच या सिनेमांच्या सिक्वेलबद्दल काही माहिती समोर आली आहे. ती म्हणजे विधू विनोद चोप्राने (Vidhu Vinod Chopra) ‘थ्री इडियट्स‘ (3 Idiots) आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस‘ (Munnabhai MBBS), ‘लगे रहो मुन्नाभाई‘ (Lage Raho Munnabhai) या चित्रपटांच्या सिक्वेलबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.
Devendra Fadanvis : बीड, परभणीमधील दोन्ही घटनांची सरकारने घेतली गंभीर दखल!
विधू विनोद चोप्रा म्हणाले कि, “सध्या फक्त ‘थ्री इडियट्स’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटांच्या सिक्वेलवर काम करत आहे आणि लवकरच चाहत्यांना एक अद्भुत सरप्राईज मिळेल. याशिवाय मी एका हॉरर कॉमेडीमध्येही काम करत आहे. मी अद्याप चित्रपटाचे शीर्षक निश्चित केलेले नाही. पुढे ते म्हणाले, ‘मला आशा आहे की ‘थ्री इडियट्स’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटांचे सिक्वेल लवकरच प्रदर्शित होतील. मला वाटलं असतं तर मी इतक्या वर्षांत या चित्रपटांचे अनेक सिक्वेल बनवू शकलो असतो. पण, असं केल्यानं मला खूप फायदा झाला असता. पण तो चित्रपट चांगला निघाला नसता तर मी काय केलं असतं. प्रेक्षकांना उत्तर देणं माझ्यासाठी कठीण झालं असतं. पैसे कमावण्यासाठी मी अशी तडजोड करू शकत नाही”. विधू विनोद चोप्राच्या या वक्तव्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
संजय दत्तचा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि आमिर खानचा ‘थ्री इडियट्स’ या सिनेमांची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. जेव्हा हे चित्रपट प्रदर्शित झाले होते, तेव्हा त्यांनी बॉक्स ऑफिसवर पैसे छापण्यास सुरुवात केली होती. जर आता या सिनेमांचे सिक्वेल आले तर ते बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडतील, यात शंका नाही. आता या सिनेमांचं सिक्वेल लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार हे नक्की.