Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीTeacher : झेडपी शाळांवरील शिक्षकांचा प्रश्न 'जैसे थे'; शिक्षक भरती देखील नाहीच

Teacher : झेडपी शाळांवरील शिक्षकांचा प्रश्न ‘जैसे थे’; शिक्षक भरती देखील नाहीच

मुंबई : जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांचा पट १ ते २० पर्यंत आहे, अशा शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक (Teacher) नेमण्याचा शासन निर्णय निघाला. त्यानंतर त्या निर्णयात बदल करून दहापर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांवर कंत्राटी शिक्षक (डीएड, बीएडधारक सुशिक्षित तरुण-तरुणी) नेमण्याचा निर्णय झाला. आता पुन्हा तो निर्णय थांबविण्यात आला असून कमी पटसंख्येच्या झेडपी शाळांवरील शिक्षकांचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. शालेय शिक्षण विभागाला यासंदर्भात आता नूतन शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.

Stray Dog : मीरारोडमध्ये ८ वर्षीय मुलाचे कुत्र्याने तोडले लचके; डॉक्टरांनी दिला प्लॅस्टिक सर्जरीचा सल्ला

राज्यातील १४ हजार ७८३ शाळांमधील पटसंख्या १ ते २० पर्यंत असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २७६६ पैकी जवळपास दीडशे शाळा आहेत. त्यात ५३ शाळांचा पट दहापेक्षा कमी आहे. या शाळांवर कंत्राटी शिक्षक घेण्याचा निर्णय झाला होता. पण, त्याची कार्यवाही थांबल्याने शासनाच्या धरसोड भूमिकेवर डीएड-बीएडधारक तरुण-तरुणी वैतागले आहेत.

राज्यात ३० ते ३२ हजार शिक्षकांची भरती केली जाईल, अशी ग्वाही तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी दिली होती. मात्र, अजूनही जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सात हजारांवर शिक्षक कमीच आहेत. अजूनही समानीकरणाअंतर्गत हजारो शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत शिक्षक (Teacher) भरलेले नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -