परतीला लागणार वेळ, तारीख पे तारीख; नासाने दिली माहिती
नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्या आहेत. त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांना पृथ्वीवर आणले जाणार आहे. सुनीता विल्यम्स यांच्याबाबत परतीचा मुक्काम वाढतच चालला असून केवळ तारीख पे तारीख जाहीर करण्यात येत आहे.
Ram Shinde : विधान परिषद सभापतीपदी राम शिंदे यांची एकमताने निवड
नासाने सांगितले की, सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांना मार्च २०२५ पूर्वी परत आणणे शक्य होणार नाही. दोन्ही अंतराळवीर जून २०२४ पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकून आहेत. बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानामध्ये बिघाड झाल्यामुळे, सुनीता आणि बुच अंतराळात अडकून पडले आहेत.