
मीरारोड : भटक्या कुत्र्याने (Stray Dog) एका आठ वर्षीय चिमुरड्यावर हल्ला करून त्याच्या शरीराची अक्षरश: चिरफाड केल्याचा भीषण प्रकार मीरारोड (Mira Road) मध्ये घडला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यानंतर या चिमुकल्याच्या चेहर्याला, तोंडाला गंभीर जखमा झाल्या आहेत.
ही घटना सोमवार १६ डिसेंबरच्या सकाळची आहे. हा मुलगा फूटबॉल खेळत असताना घराबाहेर त्याच्यावर कुत्र्याने हल्ला केला.
या मुलाचं नाव दक्ष रावत आहे. मीरा रोड मध्ये पूनम सागर भागामध्ये हा गंभीर प्रकार घडला आहे. लहान मुलगा फूटबॉल खेळत असताना एका भटक्या कुत्र्याने त्याचा चेहर्यावर आणि तोंडावर हल्ला केला. तातडीने त्याच्या मित्रांनी दक्षच्या कुटुंबियांना कळवले. त्यांनी दक्षला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी मुलाची स्थिती पाहून आता प्लॅस्टिक सर्जरीचा (Plastic surgery) सल्ला दिला आहे.
विरार (वार्ताहर) : वसई-विरार महानगरपालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांची (stray dogs) संख्या वाढली असून नागरिकांसाठी धोकादायक बनत आहे. चालू वर्षात जानेवारी ते ...
दक्षच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलाने कुत्र्याची कळ काढली नव्हती. तसेच काही दिवसांपूर्वीच त्या कुत्र्याचे व्हॅक्सिनेशन झाले होते. याच कुत्र्याने काही दिवसांपूर्वी सोसायटी मध्ये काही डिलिव्हरी बॉय आणि मुलांवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर दक्षच्या वडिलांनी जेव्हा प्रशासनाला हा प्रकार कळवला तेव्हा त्यांनी या कुत्र्याचे काही दिवसापूर्वीच लसीकरण झाल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, मिरा-भाईंदर भागात दररोज सरासरी ३२ जणांना कुत्रे चावल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. मीरा-भाईंदर भागात सुमारे ३० हजार भटकी कुत्री (Stray Dog) असून त्यापैकी काहींनी नागरिकांवर हल्ला केल्याचेही वृत्त आहे.