Monday, March 24, 2025
HomeमनोरंजनSudhir Rasal : ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

Sudhir Rasal : ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

मुंबई : प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य अकादमीने २० भाषांमध्ये वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये मराठीत ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमीने २१ भाषांमध्ये ८ काव्यंसग्रह, तीन कादंबरी, २ लघुकथा संग्रह, ३ साहित्य समीक्षक, १ नाटक आणि एक संशोधनासाठी पुरस्कार दिला. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्याला सन्मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाते. ८ मार्च २०२५ रोजी दिल्लीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

विविध भाषांमधील साहित्य पुरस्कार जाहीर

आसामी भाषेत समीर तांती, बोडो-अरोन राजा, इंग्लिश -इस्टरिन किर, गुजराती – दिलीप झवेरी, हिंदी – गगन गिल, कन्नड-केव्ही नारायणा, काश्मिरी-सोहन कौल, कोंकणी-मुकेश थाली, मैथिली – महेंद्र मलांगिया, मल्याळम – जयकुमार, मणिपूरी – हाओबम सत्यवती देवी, मराठी-सुधीर रसाळ, नेपाळी – युवा बराल.

कोण आहेत सुधीर रसाळ…

डॉक्टर सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षणात्मक पुस्तकासाठी यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. सुधीर रसाळ हे सध्या ९१ वर्षांचे असून या वयातही अलीकडेच त्यांच्या १६ व्या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच प्राध्यापक म्हणूनही त्यांची चांगली ओळख आहे. त्यांनी शासकीय कला महाविद्यालय आणि मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -