मुंबई : राज्याच्या प्रशासकीय सेवेतील गट `अ’ आणि गट `ब` संवर्गातील विविध रिक्तपदे भरती प्रक्रियेसाठी सन २०२५मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) नियोजित स्पर्धा परिक्षेचे (mpsc exam) अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीसाठी आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परिक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहे. हे वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिध्द करण्यात आले आहेत. प्रसिध्द करण्यात आलेले हे वेळापत्रक अंदाजित वेळापत्रक असून, जाहिरातीच्या अथवा परिक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
Virat kohali : मेलबर्न एअरपोर्टवर विराट कोहलीचा महिलेसोबत जोरदार वाद
संबंधित परिक्षेचे परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे आणि तो वेळोवेळी अद्यावत करण्यात येईल. संबंधित परिक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसुचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल. वेळापत्रकातील सन २०२५ मधील दिनांक निश्चित नसलेल्या परिक्षांचे दिनांक संबंधित परिक्षेच्या जाहिरात/अधिसुचनेद्वारे स्वतंत्रपण जाहीर करण्यात येतील. आयोगाकडून आयोजित परिक्षेच्या दिनांकास अन्य संस्थेची परिक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावयाची आहे. याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वत: घेणे आवश्यक आहे,असेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.