मुंबई : टेलिव्हिजन अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीनं चाहत्यांसोबत एक गूड न्यूज शेअर केली आहे. हिंदी टेलिव्हिजन सृष्टीतली लाडकी गोपीबहू म्हणजेच अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी अखेर आई झाली आहे. देवोलिना आणि पती शानवाझ शेख यांच्या आयुष्यात एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. देवोलीनाने स्वतः ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्रीने एक छोटी क्लिप शेअर करून आपल्याला मुलगा झाला ते चाहत्यांना सांगितले. गोपीबहूच्या चाहत्यांनाही आनंद झाला असून त्यांनी या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी आणि तिचा पती शानवाझ शेख हे एका मुलाचे पालक झाले आहेत. १८ डिसेंबर रोजी या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. देवोलीनाने सोशल मीडियावर चाहत्यांना खुशखबर दिली.देवोलिना आणि शानवाज दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, ‘आमचं बंडल ऑफ जॉय, १८ डिसेंबर रोजी आमच्या आयुष्यात एका मुलाचे आगमन झाले याची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.’ या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हॅलो वर्ल्ड! आमचा छोटा देवदूत मुलगा आला.’
अभिनेत्री देवोलिनाने डिसेंबर 2022 मध्ये जिम ट्रेनर शानवाज शेखसोबत लग्न केलं. त्यांनतर देवोलिनानं 15 ऑगस्ट रोजी आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. दरम्यान तिने पंचामृत विधीचे फोटो शेअर केलेले. गर्भवती महिलांसाठी ही पूजा केली जाते. जून 2024 मध्ये, देवोलिना भट्टाचार्जीनं इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.