मुंबई: थंडीचे दिवस सुरू होताच मार्केटमध्ये मेथी मिळण्यास सुरूवात होते. थंडीच्या दिवसांत मेथीचे सेवन करणे अतिशय फायदेशीर मानले जाते. मेथीचे आरोग्यास अनेक फायदे होतात. जाणून घेऊया याचे फायदे…
ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी मेथीच्या रोटीमध्ये थोडेसे आले टाकून त्याचे सेवन केले तर यामुळे कफाची समस्या दूर होण्यास मदत होते.
ज्यांना सांधेदुखीचा त्रास जाणवत असतो त्यांच्यासाठी मेथी अतिशय बहुगुणी आहे.
चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यासाठी मेथीची पाने बारीक चिरून चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्याची सुंदरता वाढेल तसेच रुक्षपणाही दूर होईल.
डायबिटीजच्या रुग्णांसाठी मेथीच्या बिया अतिशय फायदेशीर असतात. यासाठी ४ ते ५ ग्रॅम मेथी पाण्यात भिजवा. सकाळी उठल्यावर ते चावून खा. भिजवलेले पाणीही प्या. यामुळे खूप फायदा होईल.
महिलांसाठी मेथी अतिशय बहुगुणी आहे. डिलीव्हरीनंतर महिलांना मेथी आणि ओव्याचा काढा दिला जातो. यामुळे पोटातील सूज बरी होण्यास मदत होते.
आर्थरायटिसची समस्या असल्यास हळद, मेथी आणि सुंठ समान प्रमाणात घेऊन पावडर बनवा. सकाळ-संध्याकाळ १-१ चमचा सेवन केल्याने लाभ होतात.
जर तुम्ही सर्दी-खोकल्याचा त्रास आहे मेथीचे दाणे रात्रभर भिजत घालून त्याला मोड आणला आणि हे खाल्ल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळेल.
टीप – वर लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही गोष्टीचा डाएटमध्ये समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.