नागपूर : लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह तयार करण्यात आले. परंतु विधानसभेत फेक नरेटिव्ह फॅक्टरी उद्धवस्त करण्याचे काम राज्यातील जनतेने केले. विधानसभा निवडणुकीत ६६.०५ टक्के मतदान झाले. त्यातील महायुतीला ५० टक्के मते मिळाली. इतिहासात इतकी मते कधी कोणाला मिळाली नाही. आम्ही तुमचे हे फेक नरेटिव्ही लोकासमोर उघड केले. मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले. त्यावेळी फडणवीसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा चांगलाच समाचार घेतला. विधानसभा निवडणुकीची आकडेवारी मांडत नाना पटोले यांना तुमची फेक नरेटिव्ह फॅक्टर आम्ही बंद केल्याचा टोला फडणवीसांनी लगावला.
शरद पवारांना थेट प्रश्न?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वात जास्त आश्चर्य वाटले मला शरद पवार साहेबांचे. ईव्हीएमवर कधी पवार साहेबांनी वक्तव्य केले नव्हते. परंतु आता त्यांनी ईव्हीएमबाबत धक्कादायक वक्तव्य केले. ते म्हणाले ईव्हीएममध्ये अशी सेटींग केली आहे की छोटी राज्य आम्ही जिंकू, मोठी राज्य तुम्हाला मिळणार. मग कर्नाटक काय छोटे राज्य आहे का? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.
Ambadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी आश्वासन देत नवनिर्वाचित सभापतींच केलं स्वागत
LIVE | Replying in Legislative Assembly to discussion on Hon Governor’s address..
मा. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर…🕝 2.30pm | 19-12-2024📍 Vidhan Bhavan, Nagpur.#Maharashtra #Nagpur #WinterSession2024 https://t.co/WDF4S4y78N
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 19, 2024
मारकडवाडीतील आंदोलनावरुन घेरले
मारकडवाडी गावातील मतपत्रिकेवरुन देवेंद्र फडवणीस यांनी मतदानाच्या आंदोलनावरुनही विरोधकांना उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, २०१४ ची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांना ५३३ मते मिळाली. सदाभाऊ खोत यांना ६६४ मते आहेत. त्यानंतर लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये झाली. त्या निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकर यांना ९५६ मते मिळाली. तर संजय मामा शिंदे यांना ३०० मते आहेत. सर्वच आकडेवारी माझ्याकडे आहे, असे त्यांनी म्हंटलं.
देवेंद्र फडणवीस यांनी मारकवाडीत राम सातपुते यांनी केलेल्या कामाचे उदाहरण सांगितले. ते म्हणाले, राम सातपुते यांच्यासारखा सामान्य कार्यकर्ता ५ वर्ष राबतो. मारकडवाडीत एकट्या राम सातपुते यांनी २२ कोटीची कामे केली. त्यांना मारकवाडीत जास्त मते मिळाली. त्यानंतर गावातील लोकांना तुम्ही धमकावत आहात. त्याबाबतची ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. ही कोणती लोकशाही आहे? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. त्या गावातील लोकांना सांगितले, गावात घेण्यात आलेल्या मतपत्रिकेच्या मतदानावर पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाले पाहिजे. ही कोणती पद्धत आहे. ही दादागिरी लोकशाहीत खपवून घेतली जाणार नाही, असे फडणवीस यांनी म्हंटलं.