Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

'कुर्ला बेस्ट अपघात' मृतांची संख्या नऊ

'कुर्ला बेस्ट अपघात' मृतांची संख्या नऊ

मुंबई : कुर्ला परिसरात बेस्ट बसच्या भीषण अपघातात जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या नऊ झाली आहे. मृताचे नाव मेहताब शेख (२२) असे आहे.


कुर्ला पेश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयासमोर गेल्या सोमवारी ९ डिसेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास भीषण अपघात झाला होता. भरधाव वेगात धावणाऱ्या बेस्टच्या बसने अनेक पादचारी व वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये ४९ जण जखमी झाले होते. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला होता.



जखमींपैकी शीव रुग्णालयात दाखल असलेल्या आणखी एकाचा सोमवार, १६ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. तर आणखी एका तरुणाचा गुरुवार, १८ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. बेस्ट बसच्या भीषण अपघातातील मृतांची संख्या नऊ झाली आहे.


ही बस कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जात होती. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या बसने रस्त्यावरून जाणाऱ्या काही खासगी वाहनांसह रिक्षा व अनेक पादचाऱ्यांना धडक दिली. नंतर ही बस एका भिंतीवर आदळली. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना परिसरातील नागरिकांनी कुर्ला येथील महापालिकेच्या भाभा व शीव रुग्णालयात दाखल केले होते.

Comments
Add Comment