मुंबई: भारताचा क्रिकेटर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सातत्याने सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या अनेक फोटोंमुळे ती सतत चर्चेतही असते. २८ वर्षीय धनश्रीचे डान्सचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
धनश्री वर्मा आता तेलुगु सिने इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवत आहे. दिल राजू द्वारे निर्मित डान्सवर आधारित आकाशम दाती वास्तवमध्ये धनश्री दिसणार आहे. आता धनश्री वर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटोज शेअर केले आहेत.
View this post on Instagram
या फोटोजमध्ये धनश्रीचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. चाहत्यांना धनश्रीचा हा स्टायलिश लूक खूपच आवडत आहे. धनश्री पेशाने कोरिओग्राफर आहे. धनश्री वर्माच्या केवळ इन्स्टाग्रामवर ६२ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. अनेक महिने डेटिंग केल्यानंतर युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचे २२ डिसेंबर २०२०मध्ये लग्न झाले होते.
View this post on Instagram
युझवेंद्रबाबत बोलायचे झाल्यास सध्या तो टीम इंडियातून बाहेर आहे. चहलने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना गेल्या वर्षी जानेवारीत खेळला होता. तो टी-२०वर्ल्डकपमध्येही टीम इंडियाचा भाग होता मात्र त्याला एकही सामना खेळायला मिळाला नव्हता. चहल आयपीएल २०२५मध्ये पंजाब किंग्ससाठी खेळणार आहे. त्याला १८ कोटी रूपयांना पंजाब किंग्सने संघात घेतले आहे.
चहलने टीम इंडियासाठी खेळताना ७१ वनडे सामन्यात १२१ विकेट घेतल्या आहेत. तर ८० टी-२० सामन्यांत ९६ विकेट मिळवले आहेत.