Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Mumbai Gateway Accident: स्पीडमध्ये असलेल्या नौदलाच्या बोटीने प्रवासी बोटीला मारली धडक, पाहा Video

Mumbai Gateway Accident: स्पीडमध्ये असलेल्या नौदलाच्या बोटीने प्रवासी बोटीला मारली धडक, पाहा Video

मुंबई:मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियासमोर बुधवारी मोठा अपघात घडला. येथे ८० प्रवासी आणि चालक दलासह ५ जणांना घेऊन जाणारी बोट पलटली. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला ७७ जणांना वाचवण्यात यश आले. तर काहीजण अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.


यात दिसत आहे की नौदलाची एक बोट वेगाने या बोटीच्या दिशेने येते आणि जोरदार धडक देते. मीडियाच्या रिपोर्टनुसार यात ७७ जणांना वाचवण्यात यश आले आहे तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. नीलकमल नावाची ही प्रवाशांना घेऊन गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने जात होती.





सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात अभियान सुरू केले. यात नौदलाच्या ११ बोटी आणि मरीन पोलिसांच्या तीन बोटींचा तसेच तटरक्षक दलाच्या एका बोटीचा यात समावेश होता. तसेच बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी चार हेलिकॉप्टरचा समावेश आहे.

Comments
Add Comment