मनमाड : मालेगाव, नांदगाव, चांदवड, मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यात कांद्याच्या भावात घसरण सुरूच असून आज ही भाव मोठ्या प्रमाणात कोसळे असून आज कांद्याला प्रति क्विंटल २००० ते २३०० रुपये कमीत कमी तर सरासरी २००० रुपये भाव मिळाला. एक एकर कांदा पीक घेण्यासाठी सुमारे ५५ ते ६५ हजार रुपये खर्च येतो मात्र सध्या कांद्याला मिळणाऱ्या भावात वाहतुकीवर केलेला खर्च देखील निघत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे केंद्र सरकारने आम्हाला हमीभाव द्यावा कांद्यावर लावलेली निर्यातबंदी उठवावी निर्यात शुल्क शुन्य करावे यामुळे तरी शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.
कधी अस्मानी कधी सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल भावाचा फटका बसत असुन हिरव्या भाजीपाल्यासाह कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली असुन कांद्याला २ हजार ते २३०० रुपये व सरासरी २००० रुपये भाव मिळत आहे यामुळे लागत तर सोडा वाहतुक खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असुन किमान हमीभाव द्यावा निर्यातशुल्क रद्द करावे निर्यातबंदीचे धोरण ठरवावे अशी मागणी शेतकरी बांधवांतर्फे करण्यात येत आहे.यापेक्षा निर्यात शुल्क शून्य करावे यामुळे तरी कांद्याला २ पैसे भाव मिळून शेतकऱ्यांच्या पदरी काही पैसे पडतील अन्यथा आत्महत्या करण्यापलीकडे शेतकऱ्यांना पर्याय उरला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शरद पवार कृषी मंत्री असताना मनमाड येथे सभेत शेतकऱ्यांनी त्यांना निवेदन देऊन कांद्याच्या बाबतीत काही तरी करा अशी मागणी केली तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी लागलीच सभा संपेपर्यंत नाशिक येथे खासगी विमान उपलब्ध केले पवार यांनी सभा संपताच दिल्ली गाठली व सायंकाळी निर्यात शुल्क शून्य केले यामुळे तेव्हा कांद्याला विक्रमी अडीच हजार रुपये भाव मिळाला होता आजही त्या घटनेची आठवण शेतकरी सांगतात व आताचे मोदी सरकार असे का करत नाही असा सवालही ते उपस्थित करत आहेत.विशेष म्हणजे लाडकी बहीण योजना म्हणून स्रियांना खुश केले असले तरी त्यांचे कुंकवाचे धनी यांना आत्महत्या करण्यापर्यंत मजबुर केले जात आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांना मध्य प्रदेशातील नागरिक मामा म्हणून ओळखता आता त्यांनी देशातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा देशभरातील शेतकरी व त्यांचे कुटुंबीय त्यांना मामा म्हणून संबोधतील असेही शेतकरी बांधवांनी सांगितले आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण…! स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना कांद्याचे भाव घसरले होते नाशिक जिल्ह्यातील आमदारानी त्यावेळी सभागृहात गदारोळ करत व्हेलमध्ये जाऊन कामकाज बंद पाडले त्यावेळी विलासराव देशमुख यांनी २ तासाची वेळ घेतली व जानेवारी ते मार्च या ३ महिन्यात विकलेल्या कांद्याला २०० रुपये अनुदान जाहीर केले नुसते जाहीर नाही केले तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आज त्याची आठवण शेतकरी करत असुन आम्हाला हमीभाव तर द्या मात्र विकलेल्या कांद्याला अनुदान द्या यामुळे शेतकरी जगेल असे आवाहन करण्यात येत आहे.
लागत शुल्क निघत नसल्याने करावे तरी काय..! कांदा पिकाचे उत्पादन घेण्यासाठी बियाणे रासायनिक खते मजुरी याशिवाय लागत आणि काढण्यासाठी लागणारा सर्व एकूण खर्च एकरी किमान ५५ ते ६५ हजार रुपये येतो मात्र सध्या सुरू असलेल्या भावामुळे उत्पादन शुल्क तर सोडा वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला असुन असेच सुरू असले तर करावं तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.अशीच परिस्थिती राहिली तर आत्महत्या करण्यापलीकडे मार्ग नाही. – संदिप सानप, शेतकरी दोन दिवसांत याबाबत निर्णय घ्या अन्यथा आंदोलन ; विजय दराडे केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा आम्हाला आर्थिक मदत करण्यापेक्षा तसेच मोफत विविध योजना देण्याची गरज नाही आमच्या शेतीमालाला भाव द्या कांद्याला हमीभाव द्यावा कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी यामुळे आम्हाला आमचा लागत खर्च सोडून दोन पैसे मिळतील व शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील कांद्याच्या विविध प्रश्नांवर येत्या दोन दिवसांत योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन किसान सभा रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा ईशारा किसान सभेचे जिल्हा नेते कॉ विजय दराडे यांनी दिला आहे.