Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीHealth Tips : थंडीत रोज गरम दुधासह खा हे ड्रायफ्रुट

Health Tips : थंडीत रोज गरम दुधासह खा हे ड्रायफ्रुट

मुंबई: थंडीच्या दिवसांत खजूर आणि दुधाचे एकत्र सेवन आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरते. दूध आणि खजूर हे कॉम्बिनेशन आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे.

खजुरामध्ये नैसर्गिक गोडवा असतो. यात नैसर्गिक ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असते. जेव्हा दुधासोबत खजूर खाल्ले जाते तेव्हा शरीरास इन्स्टंट एनर्जी मिळते. खजुरामध्ये डाएटरी फायबर असतात यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.

जेव्हा तुम्ही खजूर गरम दुधासोबत घेता तेव्हा पाचनतंत्र व्यवस्थित राखले जाते. दुधासोबत खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि ब्लोटिंगच्या समस्येपासून आराम मिळतो. दुधामध्ये खजूर शिजवून खाल्ल्याने शरीरामध्ये हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो. अॅनिमियाच्या रुग्णांसाठी हे अतिशय फायदेशीर आहे.

खजूर आणि दुधामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. कॅल्शियम हाडांसाठी तसेच दातांसाठी गरजेचे आहे. खजुरामध्ये मॅग्नेशियमही आढळते. यामुळे हाडांची घनता वाढते.

खजुरामध्ये अनेक प्रकारचे व्हिटामिन आणि मिनरल्स जसे आर्यन, पोटॅशियम आणि व्हिटामिन बी६ असते जे इम्युन सिस्टीम मजबूत करण्यास मदत करतात. तर गरम दुधात आपल्या शरीराच्या नैसर्गिक डिफेन्सला मदत करतात.

गरम दूध प्यायल्याने बॉडी रिलॅक्स होण्यास मदत होते. तसेच गरम दूध प्यायल्याने आपल्या शरीरात ट्रिप्टोफेन रिलीज होते. याला स्लीप हार्मोन म्हणतात. खजुरामध्ये मॅग्नेशियम असते ज्यामुळे नर्व्हस सिस्टीम शांत होण्यास मदत होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -